ठाणे जिल्हाचा दहावीचा निकाल ९९.२८ टक्के

जनदूत टिम    16-Jul-2021
Total Views |

  • मागील अनेक वर्षातील सर्वोच्च निकाल
  • जिल्हात मीरा भाईंदर मनपा क्षेत्र अव्वल

ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा ९९.२८ टक्के निकाल लागला आहे. हा निकाल मागील अनेक वर्षातील सर्वोच्च निकाल असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

STUDENT-EXAM-EDITED_1&nbs
 
मागील दहा वर्षातील आकडेवारी खालील प्रमाणे
2011 - 88.39
2012 - 88.87
2013. - 88.90
2014 - 89.75-
2015. - 93.01
2016. - 91.42
2017. - 90.59
2018. - 90. 51
2019. - 78.55
2020. - 96.61
2021 - 99.28
शाळांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हात १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण
ठाणे जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ९१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी ६६ हजार ८४५ मुले तर ५७ हजार २४६ मुलीं प्रविष्ट होत्या.

ठाणे जिल्हात मीरा भाईंदर मनपा क्षेत्र अव्वल
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण डोंबिवली मनपा , उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये मीरा भाईंदर मनपा क्षेत्रातील ९९.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हात मीरा भाईंदर मनपा क्षेत्रातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.