हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करणेबाबत-शिवसेना उरण तालुक्याच्या वतीने पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी

जनदूत टिम    01-Jul-2021
Total Views |
उरण : 24 जून 2021 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीकरिता सिडको भवन येथे मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चा मध्ये काही समाजकंटकांनी हिंदूहृदयसम्राट मा.श्री.बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नावे गलीच्छ अश्या प्रकारची शिवीगाळ केल्या असल्याचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
 
bala44_1  H x W
 
असे गैरवर्तन केल्याने समस्त महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्ल शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर आणि तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उरण पोलीस स्टेशन व न्हावा शेवा पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन अशा समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
 
नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांचे नेते लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक जनता, स्थानिक भूमीपुत्रांची आहे. तसेच आगरी कोळी कराडी समाजाच्या विविध संघटनानी लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव विमानातळाला देण्यात यावे यासाठी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. तर उरण पनवेल तालुक्यासह नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण यामुळे पेटले असून यात अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतली आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी तर्फे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर एकमत झाले आहे तर भाजप, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी तसेच अन्य राजकीय पक्षांनी दिबा पाटील यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा वाद जास्तच चिघाळला.नामकरण वरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. शेवटी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सिडको भवन येथे मोर्चा काढण्यात आला.
 
या काढलेल्या मोर्चात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर अश्लील, अर्वांच्य भाषेत शिवीगाळ केलेली व्हिडीओ व्हायरल झाले असून व्हाट्सअप, फेसबुकवर सुद्धा बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील समस्त शिवसैनिक या सोशल मीडियावरील अपमानामुळे आक्रमक झाले असून ज्यांनी ज्यांनी ठाकरे कुटुंबियांची सोशल मीडियावर बदनामी केली त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातून शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.उरण तालुक्यातील शिवसेनेसुद्धा याबाबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे.
 
सोशल मीडियावर ठाकरे कुटुंबियांची बदनामी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन उरण पोलीस ठाणे, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आदी ठिकाणी देण्यात आले यावेळी तालुकासंपर्कप्रमुख जे.पी.म्हात्रे, तालुकासंघटक बी.एन.डाकी, गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, विभागप्रमुख एस.के.पुरो, महिला उपजिल्हा संघटक ममता पाटील, तालुका संघटक सुजाता गायकवाड, जि.प.सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, उरण विधानसभा अधिकारी नितेश पाटील, ग्रा.पं.सदस्य धनेश ठाकूर, माजी नगरसेवक निलेश भोईर, शहरसंघटक महेश वर्तक, युवासेना रुपेश पाटील, युवासेना शहरअधिकारी नयन भोईर, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, विकी म्हात्रे व शिवसैनिक उपस्थित होते.