जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय कृतीदल आढावा बैठक संपन्न

जनदूत टिम    01-Jul-2021
Total Views |
ठाणे : कोविड-19 या रोगाच्या अभुतपुर्व परिस्थिती मध्ये बालकांची काळजी व संरक्षण संबधीत कार्यरत संस्थांमधील बालकांची सुयोग्य काळजी तसेच कोविड-19 च्या रोगामुळे ज्या बालकांचे आई-वडीलांचे निधन झाल आहे त्यांचे पुनर्वसनाचे नियोजन करणेच्या अनुषंगाने समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय कृतीदल आढावा बैठक संपन्न झाली .
 
thaane55_1  H x
 
यावेळी सर्व महानगर पालिकांचे आयुक्‍त व संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ठाणे जिल्हयात 18 वर्षे वयाखालील एक पालक गमावलेली बालके 959 आहेत .18 वर्षे वयाखालील व्दिपालक गमावलेली बालके 29 आहेत.18 वर्षे वयावरील 23 वर्षे आतील 15 बालके आहेत. व विधवा महिला 669 आहेत. 29 बालकाचे आई वडील दोन्ही पालक कोरोना विषाणूमुळे मयत झाले आहेत.अशा बालकांना त्यांच्या वयाच्या 21 नंतर व्याजासह 5 लाख अनुदानासाठी पात्र आहेत.तर 959 बालके 1125 रुपये बालसंगोपन योजनेसाठी पात्र आहेत. संजय गांधी निराधार योजनेसाठी ठाणे जिल्हयात 669 विधवा महिला पात्र आहेत.NGO द्वारे शालेय मदतीसाठी 47 बालंकाची यादी प्राप्त झाली आहे.
 
विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबधित तहसिलदार यांनी दिले.तसेच शिक्षण अधिकारी यांनी कोविड कालावधीमध्ये ज्याचे पालक मृत्यू झालेआहेत अशा बालकांच्या शालेय शुल्कासाठी मदत करण्यासाठी माहिती देणे.अशा सुचना संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या.