पनवेल येथील अनाथांना मायेची ऊब

जनदूत टिम    07-Jun-2021
Total Views |
पनवेल : लोकनेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी संघर्ष केला.त्यांच्या उद्धारासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले . सर्वच शोषित पीडितांसाठी त्यांची ‘मायेची ऊब’ कायम होती.
 
pan44_1  H x W:
 
स्व.मुंडे साहेबांच्या स्मरणार्थ ३ जून या त्यांच्या जयंतीदिनी चिपळे येथील अनाथाश्रमातील १०० बालक व वृद्धांना तसेच ५० भिकाऱ्यांना पनवेल येथील संत वामनभाऊ व भगवान बाबा मंडळाचे ऊपाध्यक्ष तथा मंत्रालय बँकेचे संचालक सुनिल खाडे , डॉ . राजेद्र खाडे, प्रशांत खाडे, देवीदास खेडकर यांनी ब्लॅंकेट व मिठाई वाटप केले . पनवेलच्या महापौर डॉ.सौ.कविताताई चौतमोल व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत जी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
 
लॉक डाऊनच्या काळात उबदार भेट मिळाल्याबद्दल लहानग्यांच्या व वृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थित सर्व मान्यवरांचे मन भारावून गेले. यावेळी भटके विमुक्त आघाडीचे उ.रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे,भटके विमुक्त आघाडीचे पनवेल शहर अध्यक्ष श्री.गोपीनाथ जी मुंडे,सर्वश्री दिलीप नाकडे,विष्णू वायभासे, रामदास नाकाडे,ग्रामसेव विश्वास वारे व इतर मान्यवर उपस्थित होते.