जगण्याची धुसर आशा; दाण्या-पाण्या वाचुन दुर्दशा

जनदूत टिम    07-Jun-2021
Total Views |
मुरबाड : निसर्गरम्य माळशेज घाट परिसरातील शेकडो एक्कर भूभाग तीन अभयारण्य परिक्षेत्रात येत असुन; बेसुमार जंगलतोड, मानवनिर्मीत वनव्यात जंगल कालवंडले आहे. पाण्याचा अभावाने कासावीस झालेल्या पशु-पक्षांना दाणा-पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे भूक, पाण्यावाचुन व त्यातुन येणाऱ्या तणावातुन पक्ष्यांचे मृत्यू होण्याची शक्यता पक्षी अभ्यासक व तज्ज्ञांच म्हणन आहे तर हे भुकेनं व्याकुळ जिव मानव वस्तीकडे येताच त्यांच्या शिकारी होत आहेत.
 
prani44_1  H x
 
भिमाशंकर अभयारण्यात येणाऱ्या धसई गावात पाण्यासाठी वनवन करणारं पिवळ्या डोळ्याचं घुबडाचं पिल्लू पांडू विशे याच्या गुरांच्या गोठ्यात सापडले विशेष म्हणजे या पक्षला दिवसा दिसत नसल्याने कावळ्यानी जखमी केले होते त्यास जिवदानदेत रात्री जंगलात सोडून दिले.सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे व वाढत्या तापमानामुळे पक्षांच्या त्यातपिल्लाच्या शरीरात पाणी कमी होतअसल्याने भुकेले तहह्मणलेले जिव मानववस्तीकडे धाव घेतात या प्राणी पक्षासाठी अभयारण्य विभाग वनविभागाकडून कृत्रिमपाणवठे निर्माण करणे, तसेच जंगलांत बंधारे बांधणे गरजेचे असता बांधलेले बंधारे गाळ न काढता किंवा दुरूस्त न केल्याने या बंधाऱ्यात पाण्याचा थेंब ही नाही कोट्यावधीच्या या बंधाऱ्याच्या कामाची सखोल चौकशी करुन संबधीतावर पक्षीहत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा नोव्हेंबर महिना सुरु झाली की, सालाबादप्रमाणे वन्यप्राण्याच्या नशिबी ही वनवन सुरू होत त्यात अनेकांचा बळी जातो काहीची हत्या होते यास्तव किमान या प्राण्याना मुबलक पाण्याची व्यावस्था व्हावी सुरू असलेली बेसुमार जंगलतोड थांबवावी त्याच्या जागेवर मानव अतिक्रमण करु लागला म्हणून कधी कधी हिस्वप्राणी व मानवात खटके उडू लागले आहेत अभयारण्य परिसरात मोडणाऱ्या जंगल पट्टयात वन्यप्राणी व पणक्षांसाठी स्वपिठ (कृत्रिम पाणी साठवणुक) करण्या साठी वनविभागाकडे तशा स्वरूपाचा निधीही उपलब्ध असतो परंतु हे कृत्रिम पाणवठे करण्याची मेहनत म्हणा किंवा कर्तव्य बजावण्याची सेवा करण्यास वनखाते उदासिनता दाखवते त्यात मुके जिव ना हक्कासाठी भांडू शकत की ना मोर्चाकाढू शकत या मुळे हे पानवठे होत नाहीत. परंतु तो निसर्ग मात्र कोणावर अवलंबून न राहता आपली कामगिरी चोख बजावतोच गेल्या २० दिवस पडणारा अवकाळी पावसाने जागो जागी पाणी साचल्या ने वन्यप्राण्यानां तहान भागवुन जिवदान देत आहे, भविष्यात तरी या वन्यजिवांचा विचार करून कृत्रिमपाणवठे करणे सक्तीचे करावेत अन्यथा गिधाडे नामशेष झाली तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या मोर लांडोर हरण कोल्हे या जाती ही नष्ट होण्यास वेळ लागणार नाहीत.
 
वाढत्या उन्हामुळे अन्नपाण्यामुळे जिवनाच्या खटाटोपीत पक्षी तणावात जातात मानवता धर्म म्हणून वन विभागाने किमान लहान लहान कां होईनात पाणवठे हा जरी लहान विषय असला तरी वन्यप्राण्याना जिवदान देणाराउपक्रम राबविणे अत्यंत गरजेच आहे, छपरावर, गच्चीवर अंगणात किंवा झाडावर थोड्या पाण्याची व दाण्याची व्यावस्था नागरिक करतात व त्यामुळे गावालगत चे परिसरातील पक्षांना उन्हाळ्या तहान भागविणे पक्षांना जिवदान मिळू येते परंतु जंगलातील हजारो जिंवाना केवळ पाण्या अभावि जीव गमवावा लागतो हे विदारक सत्य आहे.