मराठा मंडळ, ठाणे तर्फे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळयानिमित्त शिवकालीन इतिहासाचे सुप्रसिद्ध संशोधक, लेखक ,वक्ते आप्पा परब यांची मुलाख

जनदूत टिम    04-Jun-2021
Total Views |
ठाणे : ६ जून २०२१ रोजी शिवराज्याभिषेक सोहळया निमित्त ८२ व्या वर्षात पदार्पण केलेले शिवकालीन इतिहासाचे संशोधक, ३० पुस्तकांचे लेखक, आणि वक्ते.आप्पासाहेब परब यांनी मराठा मंडळ, ठाणे, तर्फे राजेंद्र साळवी, चिटणीस, कर सल्लागार व आयजीपीएल चे मार्गदर्शक यांना ६ जून २०२१ रोजी शिवराज्याभिषेक दिना निमित्त हि विशेष मुलाखत दिली आहे.
 
maratyha44_1  H
 
हजारो दुर्गप्रेमी घडवणारे ,दुर्गसंवर्धनाची शिस्त निर्माण करणारे ,अप्पासाहेब परब यांची हि मुलाखत ६ जून२०२१ या शिवराज्याभिषेक दिनी विद्यार्थी आणि युवक वर्गासाठी खास पर्वणी आहे. या वेब मालिकेचे आयोजक मराठा मंडळ, ठाणे असून , कार्यक्रमाचे निर्माते इनोव्हेंट्स ग्लोबट्रोटिंग प्रा.लि.(आयजीपीएल) आहे.
 
ही मुलाखत इनोवेंटच्या Innovents Globetrotting Pvt Ltd ( IGPL )या युट्यूब चॅनल वर तसेच मराठा मंडळ, ठाणेच्या फेसबुक वर रविवार दि.६ जून २०२१ रोजी सकाळी १० वा. प्रसारित होणार आहे .त्यानंतर आपण खालील लिंक द्वारे कधीही पाहू शकता.
:https://www.youtube.com/channel/UCKqF_jLbABqjTNl1NEWU0fg या युट्युब चॅनलला भॆट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या आप्तजनांना फॅार्वर्ड करायला विसरु नका.नक्की पहा आणि शॆअर करा.असे मराठा मंडळ, ठाणे यांनी कळवले आहे.