उरण शहरात मनोरुग्णांचा मुक्त संचार

विठ्ठल ममताबादे    30-Jun-2021
Total Views |

  • शहरात नग्न अवस्थेत फिरत आहेत मनोरुग्ण.
  • प्रशासनाची फक्त ‘बघ्याची’ भूमिका
  • मनोरुग्णांचा बंदोबस्त करण्याची मागणी

उरण : पृथ्वी तलावरील प्रत्येक प्राण्याला स्वाभिमानाने, आनंदाने जगण्याचा हक्क आहे. मात्र काही जणांच्या नशिबात हे आनंदाने जगणे नाहीच. विविध समस्या, कौटुंबिक वादविवाद, इतर कारणांमुळे मनुष्याच्या बुद्धिवर ताण पडून त्या मनुष्याचे रूपांतर मनोरुग्णांमध्ये होतो.अश्या मनोरुग्णांना (वेडसर व्यक्तींना)आपल्या दैनंदिन गरजाही त्यांना पूर्ण करता येत नाही.त्यामुळे जिथे रिकामी जागा भेटेल तिथे राहणे, मिळेल ते खाणे, कपडे नसले तरी तसेच सर्वत्र फिरणे, चित्रविचित्र आवाज काढणे, सतत स्वतःशीच बोलणे असे लक्षणे असलेले मनोरुग्ण उरण शहरात फिरत असून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना विशेषतः महिला वर्गांना होत आहे त्यामुळे त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. मनोरुग्णांना (वेडसर व्यक्तींना)सुधारगृहात किंवा एखाद्या सेवाभावी आश्रमात त्यांची रवानगी करावी. उरण शहर मनोरुग्णमुक्त करावे अशी मागणी जनतेतून करण्यात येऊ लागली आहे.
 
korona44_1  H x
 
उरण शहरातील गणपती चौकात एक पुरुष व्यक्ती मनोरुग्ण असून ती 2,3 दिवस झाले नग्न अवस्थेत आहे. सदर मनोरुग्ण गणपती चौकातील मंदिराच्या पायथ्याशी, मेन रस्त्याच्या बाजूलाच असल्याने बाजारात येणा जाणाऱ्या महिलांना, आबाल वृद्धाना याचा त्रास होऊ लागला आहे.याबाबत बाजूलाच रिक्षा स्टॅन्ड आहे. रिक्षा चालक तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश हळदणकर यांनी उरण नगर परिषदेत फोन केला असता तुम्ही पोलीस ठाण्यात फोन करा असे त्यांना सांगण्यात आले तर दिनेश हळदणकर यांनी उरण पोलीस ठाण्यात फोन केला असता त्यांनी तुम्ही याबाबतीत नगर परिषदेशी संपर्क साधा असे सांगितले. उरण नगर परिषद व उरण पोलीस ठाणे यांनी याबाबतीत हात झटकून आपली जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे वेडसर असलेल्या व्यक्तींचा, मनोरुग्णांचा बंदोबस्त करावा तरी कसा? आणि कोणी करावा असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
 
मात्र उरण शहरात अनेक मनोरुग्ण मुक्तपणे सर्वत्र फिरत आहेत. त्यांच्या स्वतःच्या जीवालाही खूप मोठा धोका आहे. यात महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे मनोरुग्णांना जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे यासाठी त्यांची त्वरित रवानगी एखाद्या सुधारगृहात करावी यासाठी उरण नगर परिषद, उरण पोलीस ठाणे व सेवाभावी संस्थानी पुढाकार घ्यावा असे जनतेतून मागणी होऊ लागली आहे.