शहापुर मध्ये नवीन रोटरी क्लबची स्थापना

जनदूत टिम    30-Jun-2021
Total Views |
शहापुर : शहापुर तालुका येथे रोटरी क्लब ऑफ शहापुर सेन्ट्रल या नवीन क्लबची, ठाणे रोटरी (डिस्ट्रिक्ट ३१४२)डिस्ट्रिक्ट गवर्नर डॉ. संदीप कदम यांच्या हस्ते, क्लबचे संस्थापक अध्यक्ष ( चार्टर प्रेसिडेंट ) शेखर तेलवणे यांना क्लबचे चार्टर (सर्टिफिकेट ) प्रदान करून, रोटरी क्लब ऑफ ठाणे यांनी रोटरी क्लब ऑफ शहापुर सेन्ट्रल या क्लबची स्थापना केली. स्थापना समारंभ वैश्य समाज सेन्ट्रल हॉल शहापूर यथे उत्साहात संपन्न झाला.

rotary55_1  H x 
 
कार्यक्रमाला सुमारे ६० नागरीक उपस्थित होते. या क्लबचा स्थापनेसाठी डॉ. संदीप कदम,लालाजी,रविंद्र पाटील,मनोहर पाटील,सर्जेराव सावंत , शरद दलाल ,दासभाई ,प्रकाश म्हात्रे , यांनी विशेष प्रयन्त केले. शहापुर तालुका हा ठाणे जिल्हातील सर्वात मोठा तालुका असून मोठ्या संख्येने असलेल्या आदिवासी व वंचीत समाज घटकाच्या विकासात या क्लबचा हातभार लागेल, असा विश्वास डिस्ट्रिक्ट गवर्नर डॉ. संदीप कदम यांनी यावेळी व्यक्त केला .अधिक माहितीसाठी संपर्क: ७७७६९१४१४२