जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी

पारस सहाणे    29-Jun-2021
Total Views |

band55_1  H x W 
 
जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात गेले दोन दिवस चांगला पाऊस पडत पर्यटकांचे मन मोहून टाकणारा, उंचावरून कोसळणारा प्रसिद्ध दाभोसा धबधबा वाहू लागलाय, मात्र सध्या जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश असल्याने व तिसऱ्या स्तरावर पालघर जिल्हा असल्याने पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे, त्यामुळे या भागात सध्या पर्यटक फिरकताना दिसत नाहीत.
 
याचाच परिणाम म्हणून जव्हार तालुक्यतील प्रसिद्ध असलेला दाभोसा धबधबा निर्जन झाला आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर पर्यटकांनी गर्दी केली होती त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले.