खावटी योजनेतील धान्य वाटपाच्या कार्यक्रमा चा मोखाडयातून शुभारंभ

जनदूत टिम    29-Jun-2021
Total Views |
मोखाडा : निवडणूकीच्या अगोदर आदिवासी बांधवा साठी भाजपाने बंद केलेली खावटी योजना सुरू करण्याचा शब्द आम्ही दिला होता तो आज पूर्ण झाला असुन महाविकास आघाडी हि गोरगरीबांच्या पाठीशी असुन आज राज्यातील या योजनेचा शुभारंभ माझ्या मतदारसंघातुन होत असल्याचा मला मनस्वी आंनद होत असल्याचे प्रतिपादन आमदार सुनिल भुसारा यांनी केले. खावटी योजनेतील धान्य वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम मोखाडा तालुक्यातील गोंदेआणि हिरवे याठिकाणी पार पडला यावेळी ते बोलत होते.

mokhad558_1  H  
 
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापने पासून आदिवासी बांधवाच्या खावटी कर्ज योजनेचा मुद्दा समोर आला होता सदर योजना नव्याने सुरू करावी अशी आग्रही मागणी आमदार सुनिल भुसारा यांनी केली होती याशिवाय सदर योजनेतील कर्ज हा शब्द गाळून अनुदान अस करावे कारण सदर कर्ज भरताना गोरगरिबाची अडचण होत असते या सगळ्या मागन्या सभागृहात केल्यानंतर याला यश मिळालं होतं मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यासर्व बाबीला उशिर झाला होता मात्र आता रोख रक्कम 2 ,हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर आणि दोन हजार रुपये किमतीचे किराणा सामान देण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली असून राज्यातील पहिले धान्य वाटप मोखाडा येथे झाल्याचे भुसारा यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती प्रदीप वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना सदरची मदत फार महत्त्वाची असून हे सरकार खऱ्या अर्थाने आदिवासीच्या पाठिशी असलयाचे यातून दिसत आहे या धान्य किट मध्ये हरभरा मटकी चवळी तेल साखर चहापावडर अशा जवळपास 12 साहित्याचा समावेश आहे यावेळी आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास महामंडळ येथील प्रमुख अधिकारी उपस्थित होते