संचारबंदी काळात आळंदीकरांनी विनाकारण बाहेर पडू नये - व.पो.नि. ज्ञानेश्वर साबळे

जनदूत टिम    28-Jun-2021
Total Views |
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात दि.२८ जुन ते दि.०४ जुलै पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली असून या संचारबंदी काळात आळंदीकर नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे. अत्यावश्यक काम असेल तरच आळंदी शहरातील नागरिकांनी आधारकार्ड किवा ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे.

aalandi5_1  H x 
 
संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ५० पोलिस अधिकारी, २१० पोलिस अंमलदार, ९० होमगार्ड, एसआरपीएफ च्या दोन तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि घातपात विरोधी पथक बंदोबस्तासाठी कार्यरत असणार असून मंदीरात व मंदिराबाहेर तीन टप्प्यात नाकाबंदी व बेरिकेटिंग मंदीरालगत, प्रदक्षिणा रोड आणि आळंदी शहराबाहेर लावण्यात येणार असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले आहे.