ओबीसी आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडयात चक्का जाम आंदोलन

जनदूत टिम    27-Jun-2021
Total Views |
परंडा : भाजपा परंडा तालुका व भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने येथील शिवाजी चौकात चक्काजाम अंदोलन करुन आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि वेळकाढूपणाचे धोरणच कारणीभूत आहे, यामुळे ओबीसी समाजात संतापाची लाट आहे.
 
parda44_1  H x
 
तसेच सदरचे ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यामुळे येत्या जि. प. व पं. स. निवडणूकीत ओबीसींना त्यांच्या जागांना मुकावे लागणार आहे. असे सांगत ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम राज्य सरकारचे आहे, त्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे असल्याचे मत जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस ॲड. तानाजी वाघमारे यांनी केले.
 
यावेळी राज्य अल्पसंख्याक मोर्चाचे ॲड. जहीर चौधरी वैद्यकीय अघाडी तालुका अध्यक्ष डाॕ. आनंद मोरे व प्रींट मिडीया तालुका अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर यांनीही राज्य सरकारचा निषेध करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी राज्य सरकारने मागास आयोगामार्फत प्रयत्न करावेत अशी मागणी केली. या अंदोलनात ओबीसी बांधव व जिल्यातील भाजपा पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले.
 
यावेळी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष मा. राजकुमार पाटील, युवा नेते संकेतसिंह ठाकूर, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, जिल्हा अध्यक्ष सैनिक अघाडीचे महावीर तनपुरे, तालुका सरचिटणीस तानाजी पाटिल, युवा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, विकास कूलकर्णी, उमाकांत गोरे, नगरसेवक विठोबा मदने, युवा तालुका सरचिटणीस प्रमोद लिमकर, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष तुकाराम हजारे, ओबीसी जिल्हा साहेबराव पाडुळे, तालुका युवा सरचिटणीस किरण देशमुख, अ. जा. मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीमंत शेळके, बानगुडे महाराज, सरपंच शरद कोळी, युवा ता. अध्यक्ष अमोल गोफणे, तालुका उपाध्यक्ष सागर पाटील, युवा ता. उपाध्यक्ष शशिकांत खोत, वकील आघाडीचे सहसंयोजक ॲड तानाजी गरड, ॲड. अभय देशमुख, ॲड संदीप शेळके, आल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष युसूफ पठाण, मुसळे आप्पा, श्रीकृष्ण शिंदे, रामकृष्ण घोडके, परशुराम कोळी, ब्रम्हदेव उपासे, महादेव बारसकर दिव्यांग ता. अध्यक्ष,अजित काकडे, सारंग घोघरे, रब्बेसलाम पठाण, बाळासाहे गिरी, विलास खोसरे, नागेश गर्जे, रणजित शिंदे, विजय खैरे , गणेश पाटिल, सामाधान चव्हाण, बाबु दारूळे, ज्ञानेश्वर साळुंके, शंकर घुबडे, ज्ञानदेव ठवरे,ढवाण स्वामी, संभाजी खरसडे रामराजे कोळि, भाऊ जाधव, किरण कवठे ईत्यादी कार्यकर्ते या अंदोलनात हजर झाले.