वटवृक्षाचे संवर्धन, संरक्षण करत ग्रामस्थांची वटपौर्णिमा साजरी

विठ्ठल ममताबादे    24-Jun-2021
Total Views |
उरण : काही वर्षांपूर्वी उरण शहरातील देऊळवाडी येथील शंकर मंदिरासमोर असलेल्या व देऊळवाडीचे रहिवाशी असलेले विठ्ठल ममताबादे यांच्या घराशेजारी असलेले हजारो वर्षे जुने असलेले ऐतिहासिक परंपरा लाभलेले वटवृक्षाचे झाड अतिवृष्टीमुळे विठ्ठल ममताबादे यांच्या घरावर कोसळले होते.
 
vat55_1  H x W:
 
वडाचे झाड असल्याने प्रत्येक वर्षी वट पौर्णिमेला स्त्रिया वटवृक्षची पूजा करायला येत होते मात्र झाड मुळासकट तुटल्याने पूजा करायला झाडच उपलब्ध नव्हते.हजारो वर्षाची सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा खंडीत होऊ नये यासाठी देऊळवाडी युवक मंडळ व ग्रामस्थ मंडळानी त्या जागेची साफसफाई करून तेथे स्व:खर्चातून कठडा बांधला तेथे वटवृक्ष लावले. त्या वृक्षाला वेळोवेळी खतपाणी घालून पोटाच्या मुलासारखे मोठे केले. आज वटवृक्ष उंचच उंच मोठ्या दिमाखात वाढत आहे.देऊळवाडी युवक मंडळानी केलेल्या कार्यामुळे उरण शहरातील स्त्रियांना आता प्रत्येक वट पौर्णिमेला वडाच्या वृक्षाची पूजा करता येत आहे.एकंदरीत वटवृक्ष चे संवर्धन, संरक्षण करून, पर्यावरणाचे संरक्षण करत आपली वटपौर्णिमा येथील स्थानिक रहिवाशी असलेल्या मंडळाच्या सदस्यांनी, ग्रामस्थांनी साजरी केली आहे.
 
देऊळवाडीचे रहिवाशी निरंजन नार्वेकर, आकाश जाधव, तुषार म्हात्रे, रोमेश भुवड़, प्रवीण सुर्वे, जतिन तवसाळकर,सतीश पुजारी, मंगेश म्हात्रे, महेश झुजम, प्रसाद म्हात्रे, दत्ताराम पाटिल, निशांत चव्हाण,उमेश गुलगुले, रंजन मुरुडकर,मिलिंद मुरुडकर,मयूरेश पद्याळ, वेदांत नाईक, ऋषिकेश विश्वकर्मा,आशीष धाडवे,साहिल वाघले,हर्शल जाधव, विपुल झुजम, बालाजी हेड्डे, साईनाथ ममताबादे,जयेश वत्सराज, सचिन नाईक, राकेश नाईक, गिरीष गुडेकर,लालू सामंत,भूषण म्हात्रे, सुचीत पारकर, नरेंद्र पारकर,पत्रकार विठ्ठल ममताबादे, हेमंत देशमुख,नगरसेवक राजू ठाकुर,नगरसेवक धनंजय कडवे हे सर्व देऊळवाडीतील रहिवाशी देऊळवाडी युवक मंडळाचे पदाधिकारी- कार्यकर्ते असून ह्या सर्व पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवड करून निसर्ग संरक्षणाचा संदेश देत खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी केली आहे.