कारेगांव कडुचीवाडी कोचाळे रस्ता खचला

पारस सहाणे    24-Jun-2021
Total Views |

  • पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता

जव्हार : मोखाडा तालुक्यातील कारेगाव कडुची वाडी कोचाळे रस्त्यावरील मोरीचा एक भाग कोसळल्याने त्या ठीकाणचा रस्ताच खचण्याची शक्यता निर्माण झाली असून यात सुधारणा व्हावी अशी मागणी माजी सभापती विद्यमान मोखाडा पंचायत समिती सदस्य प्रदिप वाघ यांनी करूनही अद्याप त्यावर काहीच कारवाई झालेली नाही.

javhar777_1  H  
 
यामुळे येत्या पावसाळ्यात तो रस्ता पूर्णपणे बंद होवून या गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता असल्याने या रस्त्यावरील मोरीचे नुतनीकरन किंवा दुरुस्ती तात्काळ व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. मोखाड्यात रस्त्यांची दुरावस्था जवळपास संपत आली असली तरी काही ठीकणी रस्ते चांगले मात्र मोऱ्या छोटे पुल यांचा एखादा भाग कोसळल्याचे दिसून येते. असेच काहीसे चित्र या कारेगांव कोचाळे रस्त्यावर पहावयास मिळत असून यारस्त्यावरून चारचाकी वाहने रेशनिंगचा ट्रक अशी रहदारी असते मात्र या खचलेल्या रस्त्यामुळे एक बाजु पूर्णपणे मातीसदृश्य दिसत असून हळु हळु रस्त्याची रुंदी कमी होत आहे.
 
याची वेळीच दुरुस्ती झाली नाही हा रस्ता पावसाळ्यात बंद होवू शकतो अन्यथा मोठा अपघातही होण्याची शक्यता आहे. सदरची बाब आदिवासी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष ,मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप वाघ यांनी मोखाडा तहसीलदार आणि बांधकाम विभागाच्या निर्दशानास आणून दिलेली आहे तरीही यावर कार्यवाही न झाल्याने रस्ताबंद होण्याची किंवा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय असा सवाल वाघ यांनी उपस्थित करून आंदोलनाचा ईशारा दिला आहे.