शहापूर तालुक्यातील मजूर संस्थाचालकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या अभिनंदनाचा ठराव

जनदूत टिम    23-Jun-2021
Total Views |
शहापूर : शहापूर तालुक्यातील मजूर कामगार सहकारी संस्थांच्या तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार दौलत दरोडा, ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, ठाणे जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष अमोल तारमळे व शहापूर तालुक्यातील संचालक अरूण पानसरे यांच्या अभिनंदनाचा ठराव किरण निचीते यांनी मांडला व शँकर खाडे यांनी अनुमोदन दिले असता सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
 
baitha55_1  H x
 
कोविड 19 च्या प्रादुर्भावाची लागण होऊन दिवंगत कोरणा योद्ध्यांना तसेच संस्थाचालक आणि त्यांचे नातेवाईक यामध्ये राजाराम घरत, एम डी पाटील यांच्या पत्नी यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. मजूर संस्थांनी online इस्टिमेट रेट ला कामे घेण्यात यावीत असा ठराव करण्यात आला. जो बिलो मध्ये जाईल त्यासंस्थाचालकला 5% दंड किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही एकमताने ठरविण्यात आले.
 
नगरविकास विभागातील कामे पूर्ववत मजुरसंस्थांना मिळवण्यासाठी नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन मजूर संघाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरु आहे, याबाबत सकारात्मक निर्णय होईल, सर्व मजुर संस्थांना विनानिविदा व ईनीविदा मधून कामे मिळावीत म्हणून संस्थेच्या वर्गीकरणला मदत करण्यात येत आहे त्याप्रमाणे सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा असेही अध्यक्ष अमोल तारमळे व अरुण पानसरे यांनी आग्रहाने सांगितले.
 
ठाणे जिल्हा परिषद चे काम वाटप मजूर संघाकडे घेण्यात यावे यासाठी संघाच्या वतीने चर्चा करण्यात यावी तसेच शासनाकडे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सदस्यांनी मागणी केली आहे. यावर संघाचा एक प्रतिनिधी जिल्हापरिषद ने घेऊन काम वाटप करावे अशीही मागणी सदस्यांनी केली.
 
अनेक संस्था चालक राज्य शासनाने दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक जास्त निविदेची कामे वाटप करून घेतात त्यामुळे इतर संस्थांवर अन्याय होत आहे. तो होता कामा नये म्हणून मजुर संघाने उचित कारवाई करावी असा ठराव करण्यात आला. मजुर संस्था प्रतिनिधींनी ई- निविदा भरतांना EMD ची रक्कम संबधितांकडून घ्यावी असा ठराव करण्यात आला.
या सभेस दिलीप अधिकारी, जैतुदादा भोईर, बाळाराम पाटील यांच्यासह सर्व संस्था चे पदाधिकारी उपस्थित होते.