एकनाथ शिंदेंनी केली आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला घर देण्याची वचनपूर्ती

पारस सहाणे    23-Jun-2021
Total Views |
जव्हार : सन २०१९ मध्ये जव्हार तालुक्यातील खरोंडा या ठिकाणी नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर पत्नी वृक्षला हिने स्वतःचा आणि चार लहान मुलीचा सांभाळ कसा करायचा या विवंचनेतून स्वतः दोन चिमुरड्या मुलींना विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न केला यात वृक्षला व तिची तीन वर्षाची मुलगी दिपाली हिचा मृत्यू झाला तर सात महिन्याची वृषाली सुदैवाने वाचली होती.

eknath55_1  H x 
 
ही घटना घडली तेव्हा सुमित्रा वय वर्ष ९ व जागृती वय वर्ष ७ या शाळेत गेलेल्या असल्याने वाचल्या होत्या या घटनेने संपूर्ण पालघर जिल्हा हादरला होता .या घटनेची गंभीर दखल शिवसेना नेते व बांधकाम मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी घेतली व खरोंडा येथे जाउन या कुटुंबाची भेट घेतली. या मायेचे छत्र हरपलेल्या मुलींना आधार देण्यासाठी प्रत्येक मुलीच्या नावावर लाख -लाख रुपयांची फिक्स डिपाॅझीट जव्हार अर्बन बँकेत ठेवण्यात आली तसेच त्यांना घर बांधून देणार असल्याची घोषणा केली होती. दिलेला शब्द पाळत सदर मुलींना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निवाऱ्यासाठी घर बांधून देण्यात आले.
 
दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करण्यासाठी व या मायेचे छत्र हरवलेल्या मुलींना आधार देण्यासाठी दिनांक २१/६/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी खरोंडा गावात जाऊन हांडवा कुटुंबीयांसाठी बांधलेलं घर त्यांच्या ताब्यात दिले. यावेळी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख राजेशभाई शहा व खासदार राजेंद्र गावित उपस्थित होते.