भिवंडी गट शिक्षणाधिकाऱ्यांची कन्या जिल्हा परिषद शाळेत..... आदर्शवत कृतीमुळे सर्वच स्तरातून कौतुक..

जनदूत टिम    20-Jun-2021
Total Views |
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी निलम पाटील यांनी मुलगी अदिती हिचा पहिलीचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळा वैजोळा येथे घेतला आहे. पाटील उभयतांनी केलेल्या या आदर्श कृतीमुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. मागील काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपडे पालटले आहे. शाळा डिजिटल झाल्या असून गुणवत्तापूर्ण वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे सर्व स्तरातील पालक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना दिसत आहेत.
 
bhiwa123_1  H x
 
निलम पाटील या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात भिवंडी तालुक्यात गट शिक्षणाधिकारी या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. सध्या त्या बापगाव येथे वास्तवास आहेत. त्यामुळे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कल्याण व भिवंडी शहरातील इंटरनॅशनल स्कूल व खाजगी शाळेत मुलीला न पाठवता जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रवेशाप्रसंगी शिवनगर केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील पाटील उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा वैजोळा ही ज्ञानरचनावादी शाळा आहे. अपार मेहनत घेऊन मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला आहे. मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण द्यायला हवे, हे केवळ न बोलता कृतीतून दाखवून देण्याची आम्हाला संधी मिळाली. जिल्हा परिषदेच्या शाळा या गुणवत्तापूर्ण आहेत. स्पर्धात्मक जगात वावरण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत आहेत. त्यामुळे पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्यावा.
- निलम पाटील,गटशिक्षणाधिकारी भिवंडी