ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅन्केच्या मॅनेजरने पिककर्ज देताना शेतकऱ्यांकडे केली पैशांची मागणी

जनदूत टिम    16-Jun-2021
Total Views |
टिटवाळा : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅन्केच्या टिटवाळा शाखेचे व्यवस्थापक नितीन जोगी यांनी घोटसई येथील शेतकर्‍याला बिनव्याजी पिककर्ज देताना अडवणुक करुन पैशांची मागणी केल्यासंबंधीची तक्रार शेतकरी लक्ष्मण घरत यांनी बॅन्केचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर संचालकांना करुन त्यांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
Cash_1  H x W:
 
महाराष्ट्र शासनाच्या बिनव्याजी पीककर्ज योजनेतुन सदर शेतकर्‍याला घोटसई सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातुन ₹.४८०००/- चे पीककर्ज मंजूर असताना शेतकर्‍याच्या खात्यावर ट्रान्सफरसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅन्केच्या टिटवाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक नितीन जोगी यांनी केबीनमधे बोलावुन ₹.५०००/- ची मागणी केल्याची शेतकर्‍याची तक्रार आहे.
 
सदर शेतकर्‍यास दरवर्षी बिनव्याजी पिककर्जाचा लाभ मिळत असुन ते ३१ मार्च पुर्वी न चुकता कर्जाची परतफेड करतात.यावर्षीही ३० मार्चला ३९९००/- कर्ज भरणा केला असतानाही जाणुनबुजुन जुने गोमाता दुध संस्थेचे कर्ज थकीत असल्याचा बहाणा करुन ₹.५०००/- ची लाच मागितल्याचा आरोप शेतकर्‍याने केला आहे.
 
तसेच जर पीककर्ज वेळेत मिळाले नाही तर,शेतीसाठी बियाणे,खते,औषधे घेण्यास अडचण होऊन शेती ओसाड जावुन नुकसान होऊ शकते.व यास जबाबदार बॅन्क मॅनेजर नितिन जोगी हेच जबाबदार असतील,असे शेतकर्‍याचे म्हणणे आहे.
नुकतीच जिल्हा बॅन्केची निवडणुक झाली.त्यावेळी “भ्रष्टाचारमुक्त बॅन्क” अशी ग्वाही सत्तेवर असलेल्या सहकार पॅनेलने केली होती.बॅन्केचे अधिकारीच जर पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार करुन शेतकर्‍यांची अडवणुक करत असतील तर हे योग्य नाही.इतरही शेतकर्‍यांच्या बाबतीत असे घडल्याची कुणकुण आहे.याची खातेनिहाय चौकशी करुन टिटवाळा शाखेचे व्यवस्थापक नितिन जोगी यांचेवर योग्य ती कारवाई व्हावी,अशी शेतकर्‍याची मागणी आहे.
 
तरी आता बॅन्क प्रशासन व पदाधिकारी संबंधीत अधिकार्‍यावर काय कारवाई करतात,हे पाहुन नंतर पुढे काय पवित्रा घ्यायचा ते ठरवु,असे शेतकरी लक्ष्मण घरत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.