पळसोली विभागातील असंख्य भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

जनदूत टिम    13-Jun-2021
Total Views |
कल्याण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब सर्वसामान्य जनतेचा आधार बनत आहेत, एक कार्यकुशल नेतृत्व म्हणून सर्वसामान्य लोकांपासून ते तळागाळातील सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचे कार्य पोहचत आहे. त्यामुळेच शिवसेनेत अनेक लोक प्रवेश करीत आहेत.
 
patil22_1  H x
 
याचाच एक भाग म्हणून जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी तालुकाप्रमुख, उपतालुकप्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, तालुकाध्यक्ष उपस्थितीत होते. भाजप पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी वेहळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विश्वास बबन देसले, भाजपा तालुका सचिव आनंता तुकाराम देसले, माजी ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर देसले, विलास देसले, जगदीश देसले, अनंता तिवरे, मच्छिद्र देसले, रामदास देसले, शिवाजी देसले, प्रफुल चौधरी, व काकडपाडा येथील माजी ग्रा.पं. सदस्य विकास चौधरी, किरण चौधरी यासह अनेक कार्यकर्ते यांनी जिल्हा शाखा कार्यालय पडघे येथे शिवसेनेत प्रवेश केला.
 
यावेळी प्रकाश चौधरी, नितीन देसले, ज्ञानेश्वर देसले, विष्णू चौधरी, गुरुनाथ देसले, समीर शेलार मिलिंद चौधरी, गजानन चौधरी हे पळसोली विभागातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुकाप्रमुख वसंतजी लोणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघटनेचे काम करावे असे सूचित केले, तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा. सौ.सुषमाताई लोणे यांच्या प्रयत्नाने वासिंद-शेरे मुख्य रस्ता (कमानीपासून ते वेहळे गावापर्यंत) आणि काकडपाडा ते कातकरी वाडी रस्ता या दोन रस्त्यांसाठी ३०५४ अंतर्गत जवळजवळ प्रत्येकी ४० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची महिती दिली.
 
कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमांतून विविध कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ.
- ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील साहेब