आपल्या सर्वांची वासिंदची मराठी शाळा वाचवा..!

जनदूत टिम    31-May-2021
Total Views |
वासिंद : वासिंदमधील गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तसेच गेल्या काही पिढ्यांपासून व आप आपले पूर्वजांनी शिक्षण घेतलेल्या ब्रिटिश काळात बांधलेली इस.सन.१८७५ सालातील मराठी शाळा आणि आताची जिल्हा परिषद केंद्र शाळा धोकादायक झाली आहे.. आजच्या घडीला शाळा जीर्ण व पडक्या अवस्थेत आहे... पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागते.
 
vasind47747_1  
 
वासिंदची शैक्षणिक गंगेची ऐतिहासिक साक्षीदार व १५० वर्ष वयोमान पूर्ण होण्याच्या मार्गावर असलेल्या आपल्या मराठी शाळेची दुदैवी व दयनीय अवस्था “ “नुतनीकरण “बांधकाम व सध्या दुरुस्ती करून वाचवायला हवी..!
वासिंद ग्रामस्थांनी, माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत, समाज सेवी संस्था, राजकीय पदाधिकारी यांनी शासन दरबारी तातडीने कार्यवाही करिता आग्रह व पुढाकार घेतला पाहिजे.
 
गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना एकमेव शैक्षणिक आधार आपली वासिंद जिल्हा परिषद शाळा आहे. मी रितसर लेखी तक्रार व सूचना वरील पत्रा मध्ये केली आहे. वासिंदकरांनो..आपणास आपल्या बालपणी च्या पाऊलखुणा जपलेल्या मराठी शाळेचे निश्चितच उत्तरदायी व्हायला हवे.. मी प्रयत्नशील आहे.. आपण ही करा पत्रव्यवहार सुरू.. आपल्या शाळेला वाचविण्यासाठी..
- संजय सुरळके