पूर्व मौसमी पावसानी माणगांवला झोडपून काढले

नरेश पाटील    31-May-2021
Total Views |
माणगांव : उंन्हाळाचा शेवटचा ठप्प्यावर असलेला या मे महिन्याचा शेवटचा आठवड्यात वातावरणात प्रचंड गर्मी एकीकडे जाणवत असताना दुसरीकडे उखाड्याचा सरी अधून मधून कधी रिमजीम,हलका किंव्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळी, दुपारी, सायंकाळी किंबहुना रात्रीच्या वेळेत पडत आहे.असा प्रकार गेल्या तीन चार दिवसा पासून घडत आहे.
 
paus44_1  H x W
 
मात्र सोमवार दि.31 मे रोजी दुपारी बाराचा नंतर हवेत अचानक काळा ढग जमू लागले. त्याच बरोबर गार हवा वाहू लागले. दुसरीकडे सावलीही पडू लागल्याने अनु अधून मधून विजा चमखणे आणि गडगडात होत असल्याने नैरुत्य पूर्व मोसमीचा पाऊस पडण्याचा चौल लागताच.बांधकामाचा,शेतीचा, वीट भट्टीच्या ठिकाणे, महिलांचा पापड, कडधान्य सुखान्याचा कामावर, बाजार पेठेत आलेल्या ग्राहक असा सगळ्यांच्यावर चांगला तारंबळ उडाले. दुपारी एकचा सुमारास झोरधार पाऊस बरसायला सुरुवात झाले.आणि ही पाऊस तब्बल एक तास अक्षरश झोडपून काढले.
 
या झोरधार पडलेला पूर्व मोसमी पावसाने माणगांव बाजार पेठेत अक्षरशः पूर सदृश्य स्थिती दिसुन आल्याचा बाब आमच्या प्रतिनिधिस ज्येष्ठ नागरिक विठ्ठल शिंदे यानी कळविले. आदिक माहिती देताना शिंदे म्हणाले की कचेरी रोड कॉर्नरचा भाग तर गुढग्यापर्यंत पाणी आहे म्हणून सांगितले.
 
या पडलेल्या झोरधार पावसामुळे सर्व गटार, सखल भागात आणि खड्डा भागात पावसाचा पाणी जमून,तुंबुन ओलांडून,वाहून आणि सगळीकडे चिखलच चिखल झालेल्या पाहायला मिळाले.या पडलेल्या पहिला पाऊस मुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांस या उकाडाया पासून काही काळा साठी सुटका केले.हवामान खात्याने कोकण सह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या दोन चार दिवस सरी ते मध्यम स्वरूपचा पावसाचा इशारा दिले होते. त्या प्रमाणे पाऊस बरसूलागले.तर दुसरीकडे मोसमी पावसाळा येत्या काही दिवसात सुरुवात होणार हे अत्ता स्पष्ट झाल्याने लोक दुकानात पावसाळा साठी लागणारा सर्व साहित्य खरीदी करण्यासाठी उत्सुक दिसुन येत आहे.