कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला व युवक काँग्रेसच्यावतीने आमदार महेंद्र थोरवे यांचा निषेध

जनदूत टिम    30-May-2021
Total Views |
कर्जत : रायगड जिल्ह्यच्या पालकमंत्री अदिती तटकरे तसेच माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर कर्जत विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आरोप करत खालच्या पातळीची टीका केली. याचा कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला व युवक काँग्रेस यांच्याकडून काळ्या फिती लावत घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

mahila44_1  H x 
 
गुरुवार दि.२७ मे रोजी कर्जत येथे शासकीय इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री आदीती तटकरे यांचे नाव न घेता मांजर आडवी गेल्याचा उल्लेख केला. तसेच माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत बेताल वक्तव्य केली. स्त्रियांचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीचा विसर शिवसैनिक म्हणून घेणा-या आमदार महेंद्र थोरवे यांना झाल्याने त्यांनी पालकमंत्री आदीती तटकरे यांच्याबाबतीत असे खालच्या पातळीचे वक्तव्य केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत महिला तालुकाध्यक्ष ऍड. रंजना धुळे यांनी केली तर पालकमंत्री हे घटनेने दिलेलं पद आहे. पालकमंत्री हा कोणत्याही पक्षाचा नसून ते जिल्ह्याचे पालक म्हणून काम करतात. तेव्हा आमदारांसारखा जबाबदार व्यक्तीने पालकमंत्र्यांवर अश्या प्रकारची आक्षेपार्ह्य विधाने करणे चुकीचे आहे.
 
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात व त्यासह रायगडमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आहे. तेव्हा आघाडी धर्म पाळला जावा अन्यथा पालकमंत्री अदिती तटकरे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर पुन्हा अश्या प्रकारची पुन्हा कोणतीही टीका केली गेली तर जशाच तसे उत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात येईल असा तिखट इशारा कर्जत तालुका युवक अध्यक्ष सागर शेळके यांनी यावेळी दिला.
 
purush44_1  H x
 
यावेळी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आमदार महेंद्र थोरवे यांचा घोषणाबाजी करत निषेध केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा पुजाताई सुर्वे, कर्जत तालुका महिलाध्यक्षा ॲड.रंजना धुळे, कर्जत तालुका युवक अध्यक्ष सागर शेळके, उपाध्यक्ष शानवाज पानसरे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, कर्जत शहरध्यक्षा पुष्पाताई दगडे ,माजी महिलाध्यक्षा हिराताई दुबे, नगरसेविका सुवर्णाताई निलधे, मधुरा चंदन, डॉ. ज्योती मेंगाळ, बोरिवली ग्रामपंचायत सरपंच वृषाली क्षीरसागर, टेंभरे ग्रामपंचायत सरपंच दीपाली पिंगळे, दामत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच नयना आखाडे, बोरिवली ग्रामपंचायत सदस्या नेहा खडे, फाईक खान, नोमान नझे आदी उपस्थित होते.