देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघरमध्ये श्रमजीवी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

जनदूत टिम    03-May-2021
Total Views |
पालघर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पाहता आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे. यासह कोविड केअर सेंटर देखील मोठ्या प्रमाणात उभारण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये नवे कोविड केअर सेंटरचे उदघाटन करण्यात आले.
 
de88_1  H x W:
 
आज पालघर, उसगाव डोंगरी येथील श्रमजीवी कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनासाठी मा. आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. राज्यात आजघडीला कोविड केअर सेंटरची अधिक आवश्यकता आहे. कोरोना विरुद्धच्या या लढाईत वसई-विरार, पालघरच्या जनतेसोबत आम्ही नेहमीच आहोत, असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.
 
विरोधी पक्षनेते नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघरमध्ये श्रमजीवी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यासह आमदार मनीषा ताई चौधरी, विवेकभाऊ पंडित, स्नेहाताई पंडित जिल्हाध्यक्ष राजन नाईक, वसईचे तहसीलदार व संघटनेचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.