एकजुटीने कोरोनावर केली मात....सुशिक्षित तरुण ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम.....

जनदूत टिम    26-May-2021
Total Views |
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर एकुण १५४६ लोकसंख्या असलेल्या कासणे गावात कोरोनाने थैमान घातले होते. २०२०-२१ मध्ये २६ रूग्ण कोरोना पॅाझिटीव व सौम्य लक्षणे असलेले साधारण १२५ रूग्ण त्यात एकाचा मुत्यु. २०२१-२२ च्या सुरवातीला पहिल्याच एप्रिल महिन्यात ३५ लोकांचे रिपोर्ट कोरोना पॅाझिटीव व साधारण १५० व्यक्ती सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर. अचानक ४ व्यक्तींचे मुत्यु झाले. गावावर मोठे संकट आले.
 
mahila44_1  H x
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत एक व आता दुसऱ्या लाटेत लागोपाठ चार मृत्यु, असे एकूण पाच मृत्यु कासणे गावात कोरोना मुळे झाले आहेत. संपूर्ण गाव या लाटेच्या विचाराने थरकापत होता, सर्व नागरीक भीतीने त्रस्त झाले होते. मदत व उपचार करावे ते कसे व कोणी? हा प्रश्न सर्वाच्या घरा घरात पडला होता, त्यात गावातील नागरीकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच, काय करावे सुचत नाही. या महामारीचा अंकात ऐवढा होता की अशाने स्थानिक व तालुक्यातील , लोकप्रतिनिधीनी मदत सोडा....पण फोन उचलने बंद केले होते, मग मदत करील कोण आणि या महामारीला तोंड द्यावं कसं हा मोठा प्रश्न सर्व गावासमोर उभा राहिला होता.
 
अशा भीषण परीस्थितीत कासणे गावातील सेवा भावी व्यक्तीमत्व भास्कर भोईर यांनी पुढे येऊन सर्व नागरीकांशी, तरूण वर्ग यांच्या सोबत सोशल मीडियावरून चर्चा करून उपाययोजना हेतू शंभराहून अधिक लोकांचा “माझे गाव कासणे गाव” हा whatsApp ग्रुप बनवला. या ग्रुपच्या माध्यमातून कोरोना रोगावर ऊपाययोजना व माहीती घेऊन, चर्चा करून, लोकांच्या सुचनांचा, अडचणीचा चर्चे मार्फत मार्ग काढत प्रथम स्थितीत असलेल्या रूग्णांची लवकरात लवकर टेस्ट करून त्यांचा रिपोर्ट लवकर मिळावा या साठी आरोग्य सेवक जगदीश भोईर यांनी एकमेकां समवेत समन्वय साधून, कृती समिती प्रमाणे आपली भुमिका पार पाडत, हाती कर्तव्य आणि जबाबदारी घेऊन योग्य नियोजन केले, जेणेकरून रूग्णाला लवकर उपचार करणे सोपे होत गेले. अति तातडीच्या वेळी त्वरित रुग्णवाहिका मागऊन उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली जाऊ लागली.
 
सर्व गावकऱ्यांनी योग्य प्रतिसाद देऊन एका दिवसात एक लाख रूपये रक्कम तात्काळ जमा करण्यात आली. शासकीय दवाखान्यातील डॉक्टर यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शन घेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढणे यासाठी मल्टीविटामिन व व्हिटॅमिन सी च्या गोळ्यांचे १५ दिवसांचे डोस, दोन वेळा घरपोच , घरोघरी वाटप करण्यात आले. या गोळ्यांचा ऊपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी गावातली प्रत्येक नागरिकास निश्चित झाला.
 
गावात संचारबंदीचा नारा देत सर्व तरूण वर्ग एकत्र येऊन लोकजागृती करत, कामाशिवाय घरा बाहेर निघायचं नाही, “आपले कुटुंब आपली जबाबदारी” याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली, त्याचा फायदा संपूर्ण गावाला निश्चितच झाला. गावचे सरपंच, ग्रामसेवक व सहाय्यक शिरीष कोलेकर, कुणाल गोंधळी सारखे तरूण वर्ग एकत्र येऊन यांनी गावात स्वच्छता व फवारणी यावर विषेश लक्ष दिले. बाधीत रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार करण्यासाठी आरोग्य सहाय्यक जगदीश भोईर पुढे सरसावले व त्यांनी आपली भूमिका चोख पार पाडत, वेळ प्रसंगी स्वखर्चाने PPE Kit आणुन व PPE Kit परिधान करून आपला जीव धोक्यात घालून वेळोवेळी रूग्णसेवेसाठी मोलाचे सहकार्य केले. आज सर्व गावकऱ्यांच्या मदतीने कोरोनावर विजय मिळविणे हाच ध्यास हाती घेत या महामारीला एकजुटीने संघर्ष करत गावाला मोठ्या संकटापासून दूर करण्यात आले, ग्रामीण भागात असं प्रत्येक गावाने केलं तर देश कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. ग्रामस्थांच्या एकजुटीच्या प्रयत्नाचे संपूर्ण भिवंडी तालुक्यात कौतुक होत आहे.
गावातील सर्व तरूणांनी आरोग्य सोईसुविधा वाढीसाठी आप-आपल्या परीने चांगले योगदान दिल्यामुळेच आपण कोरोना पासून लवकर बरे झालो.
- गणपत पाटील (सरपंच, ग्रामपंचायत, कासणे)
सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम केले तर आपण कोरोणा किंवा कोणत्याही आजारावर मात करू शकतो, हेच गावकऱ्यांनी दाखवून दिले.
- परेश सोनावणे (ग्रामविकास आधिकारी, कासणे)