तर... शेकाप ज्येष्ठ नेते डॉ. भाई गणपतराव देशमुख मुख्यमंत्री झाले असते. – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

शाहरुख मुलाणी     24-May-2021
Total Views |
मुंबई :  पुणे येथील स्थित जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या 05 वी युवा संसद च्या साधारण जानेवारी 2020 मधील कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “ शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल केले वक्तव्य असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
 
chandra45566_1  
 
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे. अशात त्यांनी 02 वेळा मंत्री पद भूषविलेले आहे तर दुष्काळी भागातील सांगोला विधानसभेचे तब्बल 11 वेळा आमदार होते. त्यांची साधी राहणी मान, अधिवेशन काळातील एसटी महामंडळाच्या बसने प्रवास, सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी मिळण्यासाठी केलेला संघर्ष तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी सांगोल्यात असलेली “ सुतगिरण “ अशी त्यांनी ओळख निर्माण केली आहे.
 
दरम्यान या व्हिडिओ मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात की, आता (सन 2019 च्या निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार शिवसेना की, भाजपा चा ?) जे झाले ना ते सन 1999 मध्ये पण झाले. पुरेशी मेजॉरिटी आली नाही आणि मग अन्य आमदार बरोबर यायचे असतील तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ?, बीजेपी चा मुख्यमंत्री होणार ? शेवटी कालचक्र फिरत असते. त्यामुळे सन 1999 ला असेच झाले. त्याच्या मध्ये शेवटी एकमत झाले की, कोणाचाच नको, गोपीनाथ मुंडे यांना पण नको, नारायण राणे यांना पण नको, पण, गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा. असे गणपतराव देशमुखांना करा, त्यांच्या पार्टी चे 03 आमदार ! पण गणपतराव व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांचे सहमत झाले.
 
अशा प्रकारे राजकारणात येणे यशस्वी होणे पेक्षा सुद्धा वाहवा मिळवणे. त्याला ही समाधान मिळणार मी राजकारणात येऊन काही करू शकलो. लोकांनाही आनंद होणे हा माणूस होता म्हणून आमच्या सांगोला तालुक्याचा विकास झाला. आमच्या सांगोला तालुक्यात पाणी आले. आमच्या सांगोला तालुक्यामध्ये डाळिंब विदेशात जाऊ लागले हे सगळे श्रेय गणपतराव देशमुखांना जाते. अशा प्रकारची माणसे घडविण्यासाठी महाविद्यालयामध्ये काही व्यवस्था नाही. अशा प्रकारच्या इन्फॉर्मल रचना म्हणजेच युवा संसद कार्यक्रम नक्कीच युवा राजकारणी फायदेशीर ठरेल.
 
गेल्या 05 वर्षांपासून “ युवा संसद “ कार्यक्रमात सगळ्या पक्षाचे नेते मंडळी आम्ही बोलवत असतो. सशक्त युवा, सशक्त भारत, सशक्त राजकारण असा विषय यात असतो. महाराष्ट्रातील सर्व स्थरातील 400 ते 500 युवा या कार्यक्रमात सहभागी होत असतात. छात्र संसद च्या धर्तीवर हा कार्यक्रम मराठीत राबिबला जातो. युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवगळे आजी - माजी मंत्री, पक्षातील नेते, ज्येष्ठ पत्रकार मंडळी, आदी क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून त्यांचे विचार या युवकांना दिले जाते. सशक्त राजकारण करण्यासाठी चांगले लोक राजकारणात आले पाहिजे. नैतिकतेचा वापर करणारे लोक राजकारणत आले पाहिजेत. सर्वसाधारण हा असा कार्यक्रम असतो अशी माहिती जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी दिली. तर उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी युवा संसद आम्ही अजून सशक्त करण्यार असल्याचे सांगितले.