कांदिवली पूर्व येथील ग्रोवेल्स मॉल या ठिकाणी ड्राईव्ह इन मोफत लसीकरण केंद्राचा शुभारंभ

जनदूत टिम    21-May-2021
Total Views |
मुंबई : कोरोना विरोधातील लसीकरणाकरीता नागरिकांची परवड दूर व्हावी व लसीकरण जलद व्हावे या करिता भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व मतदारसंघातील आठही प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असून, कांदिवली पूर्व मतदारसंघातील ग्रोवेल्स मॉल या ठिकाणी ड्राईव्ह इन मोफत लसीकरण सुविधेचा आज मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते व आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
 
atul256_1  H x
 
कांदिवली पूर्व मतदारसंघातील नागरिकांना आपल्या नजीक लसीकरण करता यावे या करिता आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नातून यापूर्वीच कर्मचारी राज्य बीमा निगम हॉस्पिटल, कांदिवली पूर्व, अलीका हॉल, लोखंडवाला, तेरापंथ भवन, ठाकूर कॉम्प्लेक्स, मालाड पूर्व येथे सराफ मातृ मंदिर सभागृह, स्वामींनारायन मंदिर सभागृह, धनजीवाडी समाज मंदिर या ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
 
कांदिवली पूर्व मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी आपले लसीकरण करून घेऊन स्वतः सह आपल्या कुटुंबियांना कोरोना सारख्या महामारीतून सुरक्षित करावे असे आवाहन सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.