तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

जनदूत टिम    21-May-2021
Total Views |

  • तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पाहणी केली.
 
eknath747_1  H
 
यावेळी उन्मळून पडलेली झाडे, घरांचे पत्रे उडून झालेलं नुकसान आणि उध्वस्त झालेल्या फळबागांची त्यांनी पाहणी करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील ग्रामीण भागात असलेल्या चिरड गाव, शेलार पाडा, तसेच वांगणी येथील काराव येथील फळबागांच्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. त्यासोबतच अंबरनाथ शहराला लागून असलेल्या फणशीपाडा आणि बारकूपाडा या झोपडपट्याची चक्रीवदळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी या भागाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांनीही या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.
 
चक्रीवादळामुळे या भागातील भूमीपुत्रांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. मोठं मोठी झाडे उमळून पडली होती. याशिवाय काही घरांचे पत्रे पडून घरातील लहान मुल जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व घरांची पाहणी करून या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांची डागडुजी करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.