प्राथमिक शिक्षणचा कारभार महिला बाल विकासच्या भोसलेंकडे ?

जनदूत टिम    20-May-2021
Total Views |

  • संतोष भोसलेच्या डोक्यात शिक्षणमंत्र्याचा रुबाब!!!!

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणारे संतोष भोसले यांच्याकडे शिक्षण विभागाचा कारभार सोपवला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कामाचा जरा सुद्धा नॉलेज नसतांना शिक्षणमंत्री असल्याचा तोरा मिरविन्यात भूषण समजणाऱ्या संतोष भोसले याने आपल्या खात्याचा कारभार अगोदर नीट करण्यासाठी चालू पडावे अशी ओरड होत आहे.
 
ZP Thane_1  H x
 
ठाणे जिल्ह्यात शिक्षण विभागाचा कारभार महिला व बालविकास अधिकाऱ्याच्या हाती सोपवून शिक्षणाचे वाटोळे करण्याचा चंग प्रशासनाने बांधला आहे हे सिद्ध होत आहे. ठाणे जिल्ह्यातील शिक्षणाचं भवितव्य संपवून टाकण्याचा विडा उचललेल्या जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संतोष भोसले यांच्या नियुक्तीने तर हद्दच ओलांडली आहे. भोसले यांच्या स्वतःच्या विभागात गोलमाल काम करणारा हा अधिकारी शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाच्या कामाचा कोणता अनुभव घेऊन काम करणार आहेत की मोठा आर्थिक व्यवहार करून यांना चार्ज दिला आहे, याबाबत उलट सुलट चर्चा व्यक्त केली जात आहे.
 
यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शिक्षण विभागात करोडो रुपयांच्या कमाई वर डोळा ठेवून संतोष भोसले यांनी खुर्ची पटकावली याचीही चर्चा जोरात रंगली आहे. भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला व बालविकास चे संतोष भोसले यांनी दोघांनी मिळून शिक्षण विभागावर कब्जा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. एका वर्षात तीन प्रभारी शिक्षणाधिकारी नेमलेली ठाणे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातली एकमेव जिल्हा परिषद असू शकते.
 
ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेच्या कारभारात लक्ष घालण्यास वेळ नसल्यामुळे मंत्रालय पालकमंत्री, मुख्यमंत्री हे सर्व जण शिवसेनेचे असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता असताना याठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांच्या कडून काम करून घेण्याचा पाडलेला पांयडा हा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला घातक ठरणार आहे हे मात्र नक्की.
 
शिक्षणाचे वाटोळे लावण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार घेतलेल्या संतोष भोसले यांनी आपले दप्तर उचलावे आणि महिला बालविकासच्या विकासाचे काय करता येईल तेवढे कल्याण करावे जेणेकरून ठाणे जिल्ह्यातील बालमनावर संस्कार करण्याची आपली क्षमता नसताना आपण अशा प्रकारचा शिक्षण विभागाचा कार्यभार शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून घेणे हे मूर्खपणाचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बैठकीत आहे नंतर बोलतो असा निरोप दिला.
सी ओ भाऊसाहेब दांडगे यांचा संपर्क होऊ शकला नाही.