पोटलज येथे प्रीमिअर लीगचा थरार

भूषण सुतार    04-Apr-2021
Total Views |
पाली/गोमाशी : श्री जागसूददेव क्रिडा मंडळ याने यावर्षी होळी निमित्त प्रथमच प्रकाशझोतात बॉक्स अंडरार्म क्रिकेट स्पर्धेचे पोटलज प्रीमिअर लीग (PPL) चे भव्य आयोजन केले होते.
 
potlaj025_1  H
 
ह्या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे गावातील मुलांचे आठ संघ तयार करून आठ संघ मालक देखील गावातीलच होते. त्यामुळे या स्पर्धेची रंगत वाढली. या स्पर्धचे नियोजन ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाने अत्यन्त देखणे केले होते. या स्पर्धेतील प्रत्येक सामना हा रंगतदार झाला. या स्पर्धेसाठी मुबई ,पुणे ठाणे वरून आलेल्या क्रीडा रसिकांची, खेळाडूंची तुफान गर्दी होती.
 
पोटलज प्रीमिअर लीगचा अंतिम सामना पोटलज फायटर आणि जय हनुमान वॉरियर्स या बलाढ्य संघात झाला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना पोटलज फायटर संघाने १८चेंडूत १४ धावांचे माफक आव्हान जय हनुमान वॉरियर्स या संघापुढे ठेवले. त्यामुळे वॉरियर्स संघाला आपला विजय दृष्टीक्षेपात वाटत होता. मात्र तसे झाले नाही या मोजक्या धावांचा पाठलाग करताना वॉरियर्स संघाला 3 धावावर पहिला धक्का दिला त्यानंतर कर्णधार दामोदरच्या रुपात ८ धावावर दुसरा धक्का देऊन फायटर गोलंदाजाने अचूक मारा करून विजयाच्या दिशेने वाटचाल केली. मोजक्या १४ धावा देखील वॉरियर्स संघाला डोंगरायेवढ्या वाटू लागल्या . या सामन्यात फायटरच्या सुधिर ,संतोष या क्षेत्ररक्षकांने चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण करून आपल्या संघाला अंतिम विजयी करून PPL चषकावर आपले नाव कोरले.

p[otlaj025_1  H

श्रीजागसुददेव क्रिडा मंडळच्या पोटलजच्या प्रीमियर लीग मध्ये प्रथम पारीतोषिक पोटलज फायटर तर द्वितीय पारीतोषिकावर जय हनुमान वॉरियर्स या संघाला समाधान मानावे लागले तसेच तृतीय पारीतोषिक माऊली वॉरियर्स आणि चतुर्थ पारीतोषिक सेवन स्टार हे संघ या विजयी संघास मंडळाकडून आकर्षक चषक आणि मेडल देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ मराठा वॉरियर्स याला घोषित करण्यात आले. या पीपीएलचा उत्कृष्ट फलंदाज संदेश हुले उत्कृष्ट गोलंदाज नितेश कदम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दामोदर हुले यांना चषक देऊन गौरविण्यात आले.