आकाशात चंद्राभोवती अनोखा दृश्य

नरेश पाटील    25-Apr-2021
Total Views |
माणगांव : शुक्रवार दि.23 रोजी रात्रीच्या वेळी आकाशात चंदा मामाच्या भोवती म्हणजे काही अंतरावर एक मोठा गोलाकार वृत्ताचे अनोखे दृश्य अनेकांच्या नजरेस निदर्शनास आले. हे दृश्य पहाटे दिड वाजे पर्यंत होते. दिवसाची वेळ म्हणजे पावसाळ्यात आकाशात धनुष्यबाण पाहायला नेहमी मिळत असते मात्र रात्रीच्या वेळी असे दृश्य पाहावयास मिळत नाही.
 
chandra474_1  H
 
मात्र चंद्रा भोवती जर रात्रीचा धनुष्यबाण हा प्रकार ऐकण्यास एक प्रकार दुर्मिळच होय. मात्र याला एक अपवाद म्हणून अदभूत म्हणायला हरकत नाही. चंद्रा भोवती गोलाकार जे दिसुन आले ते संपूर्ण रायगड जिल्यात अनेकांनी पाहिले किंबहुना सुखदा अनुभवलेही. माणगांव येतेही ही दृश्य उगडया डोळ्यांनी अनेक जणानी आणि आकाश प्रेमिनी पाहिले. ही बाब ज्या वेळी समोर आले त्यावेळी अनेकानी बाहेर येऊन पाहत होते.मात्र काही क्षणासाठी कोणाचाही लक्षात येत नव्हते की काय ? मात्र ज्या वेळी चंद्र पासून काही अंतर आपण नजर ठाकल त्या वेळी आपल्याला एक मोठा सफेद रंगाचे गोलाकार दिसतो असे सांगताच अनेकांना ती दृश्य पाहून थक्क बसले.
 
ही बाब माणगांव सह संपूर्ण रायगड जिल्यात हाहा म्हणत वारा सारखे बातमी पसरून अनेकांना हे दृश्य पाहण्यास योग मिळवून दिले. आमच्या प्रतिनिधीनेही ही दृश्य पाहून आश्चर्य चकित झाले. असा प्रकारचा माहिती अभ्यासात अगर इतिहासात मुळीच माहिती अवगत नसल्याने हा प्रकार एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळालेल्या एक योग संधी म्हणायला हरकत नाही.
 
अनेक जणानी आपला मोबाईल मध्ये हे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र फक्त चंद्र दृश्य मोबाईल मध्ये कैद होत होते. चंद्र भोवती असलेल्या दृश्य मोबाईल मध्ये दिसुन येत नव्हते. उगडया डोळ्यांनी आकाशत स्पष्ट हे गोलाकार दिसत होते मात्र मोबाईल मध्ये कैद होत नसल्याने अनेकांचा ब्रहम निरासा जाले. मात्र काही युवकांनी आपला स्टॅंडर्ड केमेरा बाहेर काडून रात्री आकाशात दिसुन आलेल्या चंद्र भोवती दृश्य कैद करून एका मेकाला शेर करून आनंद लुटले. याचा आनंद जास्त बच्चे कंपनीने लुटला.