बोईसरच्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांने दिलेल्या दणक्यानंतर सिटी स्कँन सेंटर मधील लुट थांबली

जनदूत टिम    25-Apr-2021
Total Views |
बोईसर : बोईसर शहरात असलेल्या सिटी स्कँन सेंटर मध्ये रूग्णांन कडून 3500 रूपये एचआरसीटीचे घेतले जात होते. जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी देखील जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले.
 
dig44_1  H x W:
 
आज याबाबत समाज माध्यमातून आवाज उचलल्यावर पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत संखे, ग्रामपंचायत सदस्य अतुल देसाई व सामाजिक कार्यकर्ते सचिन संखे यांनी तातडीने बोईसर मधील सिटी स्कँन सेंटर मध्ये जावून परिस्थिती जाणून घेतली.
 
बोईसर मधील रुप रजत सिटी स्कँन सेंटर, आँरेंज सिटी स्कँन सेंटर व बोईसर सिटी स्कँन सेंटर याठिकाणी बेकायदेशीर पणे खाजगी रुग्णांन कडून 3500 रूपये घेत असल्याने दिसून आल्यावर त्याचा जाब संबंधित सिटी स्कँन चालकांना विचारण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी केळकर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी शासन दरपत्रक बाबत कळवतो सर्वांना असे सांगितले.
 
शासनाच्या परिपत्रका नुसार 2 हजार रूपये घेणे बंधनकारक असताना याठिकाणी राजरोसपणे लुट चालली होती. सर्वांना समज दिल्यानंतर व अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्यानंतर सर्व ठिकाणी यापुढे शासनाच्या पत्रकानुसार 2 हजार रूपये आकारले जातील असे सिटी स्कँन चालकांनी मान्य केले.