वासिंद परिसरात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी!

जनदूत टिम    21-Apr-2021
Total Views |
वासिंद : शहापूर तालुक्यात कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही दिवसांमधील आकडेवारी पहाता दररोजच्या चाचणीतून पोजिटिव्ह रुग्णांची यादीतील ३५ ते ४०°% रुग्ण वासिंद परिसरातील आहेत.शहापूर तालुक्यात गोठेघर आश्रमशाळा येथे १६० बेडचे एकमेव कोविड सेंटर असल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी वणवण फिरावे लागते.
 
barora_1  H x W
 
कोरोनाग्रस्त रूग्णांची वाढती संख्या व अपुऱ्या वैद्यकीय सोयीमुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.तालुक्यातील रुग्णांची हेळसांड लक्षात घेता ( जे.एस.डब्ल्यू) जिंदाल कंपनी सी.एस.आर फ़ंडातून तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी शासकीय आश्रमशाळा दहागाव येथे 200 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी शहापुर तालुक्याचे मा.आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांनी व्यवस्थापक श्री.पालेकर यांची भेट घेऊन केली.
 
वासिंद येथे लवकरात लवकर कोविड सेंटर सुरू करावे याबाबत पालकमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व जिल्हाधिकारी मा.राजेश नार्वेकर साहेब यांना लेखी स्वरूपात मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे.