शहापूर तालुका तीन दिवस खुला, २२ एप्रिलस पासून पूर्णत: लॉकडाऊन

जनदूत टिम    19-Apr-2021
Total Views |
शहापूर : आज शहापूर पंचायत समिती सभागृह येथे आयोजित कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती,शहापूर तालुक्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता, सदरचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्याकरिता ही बैठक पार पाडली.
 
lock45_1  H x W
 
या बैठकीसाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित कल्याण जमाती समिती प्रमुख (राज्यमंत्री) तथा आमदार शहापूर विधानसभा (दौलतजी दरोडा) साहेब, शहापूर तहसिलदार (नीलिमा सूर्यवंशी) म्याडम, ठाणे जिल्हा परिषद कृषी समिती सभापती (संजय भाऊ निमसे) , शहापूर पोलीस स्टेशनचे Pi (घनश्याम आढाव), शहापूरचे पंचायत समिती गटविकास अधिकारी (अशोक भवारी साहेब), आरोग्य अधिकारी शहापूर (तरुलता धानके ), सहाय्यक गटविकास अधिकारी (सुशांत पाटील साहेब), माजी आमदार (पांडुरंग बरोरा), शहापूर पंचायत समिती सभापती (रेश्मा मेमाणे) म्याडम, उपसभापती पंचायत समिती (जगन पष्टे) साहेब, राष्ट्रवादी काँगेस पार्टी तालुकाध्यक्ष (मनोजजी विशे साहेब), शिवसेना तालुकाध्यक्ष (मारुती धिर्डे), साहेब,आय काँगेस तालुकाध्यक्ष (महेश कुमार धानके) साहेब, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष (भास्कर जाधव), शिवसेना उपतालुका प्रमुख (सुरेंद्र तेलवणे) (जेष्ठ नेते प्रकाशजी भांगरथ सर), संजयजी सुरळके साहेब, सुधीरजी जगे साहेब, पत्रकार सुनील घरत, ओमकार पातकर आदी शासकीय अधिकारी, पत्रकार, व्यापारी मंडळ, समाजसेवक, सर्वपक्षीय नेते उपस्थित होते (२२ एप्रिल ते २ मे पर्यंत) पूर्णपणे लॉकडाऊन शहापूर तालुक्यात करण्याचा सर्वांनुमते मान्य करण्यात आला असून उद्या पासून २१ एप्रिल पर्यंत पूर्णपणे दुकाने खुली करण्याचे सर्वानुमते मान्य केले आहे तरी सर्वानी मास्कचा वापर करून सोसिअल डीस्टँश पाळणे आवश्यक आहे स्वतःची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे अश्या सूचना केल्या.