राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या राजवाडा प्रशासना कडून दुर्लक्षित

सिकंदर अनवारे    26-Mar-2021
Total Views |
दासगाव : किल्ले रायगडवरील थंड हवा,सोसाट्याचा वारा राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांना वृध्दापकाळा मुळे सोसवत नव्हता.आणि म्हणुनच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य पाचाड गावा जवळ मॉ साहेबां करीता प्रशस्त वाडा बांधला. या वाड्याला अतिशय भक्कम तटबंदी असुन तटाची भिंत २ मिटर पेक्षा अधिक जाड असुन ४ मिटरपेक्षा उंच आहे.
 
jija mata145_1  
 
गेल्या कांही वर्षा मध्ये वाड्याची तटबंदी अनेक ठिकाणी जरी कोसळलेली दिसत असली तरी गत काळांतील वैभवाच्या खुणा आजही दिसुन येतात.इतिहासाचा साक्षिदार असलेल्या या ऐतिहासिक वाड्याच्या साफसफाईकडे भारतीय पुरातत्व विभागा प्रमाणे प्रशासना कडून देखिल दुर्लक्ष होत आहे .वाड्यांच्या आंतील आणि बाहेरील परिसरांमध्ये पावसा मुळे सर्वत्र गवत उगवलेले असुन सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. या स्थळाला भेट देण्या करीता येणाऱ्या पर्यटकांना त्याच बरोबर शिवभक्तांना अनेक अडचणीनां सामोरे जावे लागत आहे.
 
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अत्यंत सुरक्षित ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्या करीता वाडा बांधला. किल्ले रायगडावर जाण्याचा मुख्य रस्ता पाचाड गावांतुन जात असल्याने शिवका मध्ये हा परिसर पुर्णपणे संरक्षित असा होता.या गावांमध्ये मोठी बाजार पेठ असल्यामुळे किल्ले रायगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सतत संपर्वâ राहात असे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगड वाडी मध्ये मोठी बाजार पेठ होती त्याच बरोबर महाराजांच्या मंत्री मंडळातील प्रमुखांचे वाडे या परिसरांत होते,वाडीला भेट दिल्यास सर्वत्र भग्न झालेल्या वास्तुंचे अवषेश दिसुन येतात.
 
गेल्या अनेक वर्षा पासुन गडाच्या परिसरांमध्ये असलेल्या ऐतिहासिक वास्तुंकडे दुर्लक्ष झाल्याने ख्ांडर तयार झाले आहेंत. या ऐतिहासिक वास्तुचा अभ्यास करण्यासाठी अनेक इतिहास तज्ञ या परिसराला भेट देण्यासाठी येतात परंतु कोणत्याही स्वरुपाची सुवीधा नसल्याने पर्यटक आणि इतिहास प्रेमींचे गैर सोय होते.. ५८०५८०४ या ठिकाणी शिवकालांमध्ये दहा हजाराची शिबंदी होती. पाचाड येथुन किल्ले रायगडाला जीवनावश्यक वस्तु पुरविण्याचे काम येथील व्यापारी करीत होते.या परिसरांत असलेल्या जुने पाचाड,वाळसुरे,वाघोली,वाघेरी,छत्री निझामपुर, पुनाडे, रायगडवाडी, वांरगी, बावले, करमर, कावले, सावरट, नेराव, कोंझर, मांगरुण, सांदोशी ,आमडोशी, खलई, देवघर, वरंडोली इत्यादी गावांचा संपर्वâ असल्याने पाचाड गावाला महत्व प्राप्त झाले होते.
 
राजामाता जिाजाऊ मॉ साहेब यांच्या करीता खास बांधण्यांत आलेला वाडा अतिशय भक्कम आणि प्रशस्त होता.तटबंदीतुन तोफा डागण्याची विंâवा गोळीबार करण्यासाठी झरोके ठेवण्यांत आले होते.वाड्याला दोन भव्य प्रवेश द्वारे होती. वाड्यांच्या आतील भागांमध्ये दिवाणखाना, देवघर, शयनगृह, वृंदावन, दासींच्या खोल्या इत्यादी व्यवस्था करण्ंयात आलेली होती.परंतु कालांतराने या सर्व वास्तु आज भग्नावस्थेंमध्ये आहेंत. वाड्याच्या तटबंदी मध्ये सुंदर शौचकुपे आहेंत,तटावर जाण्यासाठी आतुन पायNयांचे जीने आहेंत, वाड्या मध्ये दोन विहीरी असुन राजमाता जिजाऊ मॉ साहेब याच विहीरीच्या बाजुला बसुन या परिसरांतील जनतेच्या समस्या सोडवित असत.सध्या या वाड्याची दुरुस्ती आणि देखभाल पुरातत्व विभागा कडे असुन या विभागा कडून योग्य प्रकारे काळजी घेण्यांत येत नसल्याने शिवप्रेमी मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज येता जाता मातोश्रींचा आशिर्वाद घेण्यासाठी त्याच बरोबर सल्ला मसलत करण्यासाठी याच वाड्या मध्ये येत असत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेका नंतर बारा दिवसाने याच वाड्यांमध्ये राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांचे दुख:द निधन झाले.वाड्या जवळच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यांत आले,या जागेवर मॉ साहेबांचे समाधी स्थळ आहे.
 
राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांचे निवास स्थान असलेल्या पाचाड येथील वाडा हा अत्यंत मौल्यवान ऐतिहासिक ठेवा असुन त्याचे जनत करण्याची जबाबदारी प्रत्येकाची जरी असली तरी भारतीय पुरातत्व विभागा कडून योग्य प्रकारे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप वेळोवेळी केला जातो.येत्या कांही महिन्यांमध्ये रायगड प्रधिकरणाच्या माध्यमांतुन या वाड्याची देखिल दुरुस्ती करण्यांत येणार असल्याची माहिती देण्यांत आली.