माणगांव नगर पंचायत तर्फे वसुली मोहीम

नरेश पाटील    25-Mar-2021
Total Views |
माणगांव : नगर पंचायत तर्फे शहरातील नागरिकांस बौधीक सुविधा पूरविण्यात येत असते. जसे पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, त्याची दूरस्ती, देखभाल, पथे, दिवे, स्वच्छता, शौचालयाच्या सुविधा, बगीचा, लागणारी महत्वाचे कागदोपत्री, परवानगी अशा काही गोष्टी केल्या जातात, तर या सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी पंचायतीला जनतेकडून प्राप्त होत असलेल्या महसूल, तसेच न.प. ईतर माध्यमातून प्राप्त करीत असलेल्या अर्थ सहायातून कामकाज तसेच नागरिकांच्या उपयोगी उपक्रम राबवित असतात.
 
mangaon_1  H x
 
अशा वेळी येणे महसूल वेळेवर प्राप्त झाल्यास नगर पंचायतचे सर्व कामकाज सुरळीत होत असते. जसे नगर पंचायत जनतेसाठी वचन बद्ध आहे तीच नागरिंचीही जबाबदारी आहे की वेळेवर सर्व देणे पट्टी भरले पाहिजे. वसुली ही फार मोठया प्रमाणे येणे दिसत आहे. कर्मचारी अनेकदा घरोघरी जाऊन सुध्दा वसुली करण्यास अपयशी दिसुन येत आहेत.
 
त्यातच आता मार्च एंडिंग येत असल्याने वसुली पूर्ण होण्याची नित्यांत गरज आहे. सोबत कर्मचारी यांचा पगार वेळेत मिळाला पाहिजे. तर ही बाब वेळेत नागरिकांनी कार्यालयात येऊन भरले पाहिजे. मात्र अस दिसुन येत नसल्याने आता नगर पंचायत मधील वरिष्ठ कर्मचारी हे खुद्द मैदानात उतरून नगरातील अनेक वार्ड मध्ये जातीने घरोघरी फिरून वसुली करत आहे. आणि ही निदर्शन प्रतिनिधीस नुकताच काही दिवस पूर्वी नजरेस पडले. त्यावेळी त्यांच्याशी माहिती घेताना असे समोर आले की अनेक नागरिकांनी न.प. चा महसूल थकवले आहे. आमच्या कार्यालयनी कर्मचारी वसुली साठी आले असता अनेकांनी वेळ मारून नेले. तर दुसरीकडे वसुली महसूल प्रचंड येणे बाकी असल्यामुळे आम्ही स्वतः आता वसुली मोहीम हाती घेतली आहे.
 
काही लोक देणे पट्टी वेळेत भरीत नाही, तर महसूल भरण्यास टाळा टाळ करीत आहेत. असे असताना आपण त्यांचवर काय कार्यवाही आपण करणार असे वरिष्ठ लिपिक पाटील यांना विचारले असता त्यांनी प्रतिनिधीस उत्तर दिले की आमच्या नगर पंचायतचा इंजिनियर यांचाशी चर्चा करून घरपट्टी, पाणी पट्टी न भरणाऱ्यांवर कार्यवाही म्हणून पाणी कनेक्श कापले जाईल असे निदर्शनास आणून दिले. तर दुसरे प्रश्न असे विचारले की ज्या ज्या लोकांची पट्टी येणे बाकी आहे अशा धारकांना आपण काय अहवान करणार म्हणून विचारले असता पाटील यांनी सांगितले की, आणखिन एक शेवटची संधी आम्ही देतो. आपली येणे पट्टी लवकरात लवकर भरा आणि सहकार्य करा असे सांगितले.