जव्हार तालुक्यातील ग्रामीण बाजारपेठेमध्ये मंदीचे सावट

पारस सहाणे    25-Mar-2021
Total Views |
जव्हार : एक वर्षा पुर्वी कोरोना संसर्गामुळे सार जग ठप्प झालं होत. लॉक डाऊनला वर्षपूर्ती होत आली आहे. याचा परिणाम सर्वाधिक ग्रामीण जीवनावर झाला. जव्हार या आदिवासी बहुल तालुक्यातील ग्रामीण वस्ती,पाडयावरील परिसरातील अनेक भागात आज ही लॉक डाऊन मुळे तसेच रोजगार गेल्याने शहरी व ग्रामीण बाजार पेठेवर मंदीचे सावट निर्माण झाले आहे.
 
bajarpeth_1  H
 
एक वर्ष उलटल्यानंतरही अर्थ व्यवस्थेची घरसलेली गाडी रुळावर आली नसल्याने तसेच ग्रामीण भागातले अनेक छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाल्याने त्याचा व्यापारी बाजारपेठेवर मोठा परिणाम जाणवु लागल्याने आता मात्र व्यापारी वर्ग चिंताग्रस्त पहावयास मिळाले. एक वर्षा पुर्वी लॉक डाऊन काळात रो.ह.यो ची संपुर्ण कामे किमान पाच-सहा महिने ठप्प होती. त्यामुळे मजुराचा रोजगार बुडाला त्यातच विविध कार्यक्रम बंद होते, मोगरा सोनचाफा सडून गेला, भाजीपालाला मार्केट नसल्याने शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. या मुले ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मजूर व शेतकरी यांना आर्थिक फटका बसल्याने लॉक डाऊनमुले बाजारपेठेत गेल्या पाच महिन्या पासुन मंदी असल्याची ओरड व्यापारी वर्गा कडून केली जात आहे.
 
वर्षभरा पासुन सरकारही दररोज नविन नियम,नविन घोषणा करीत आहेत. त्यामुळे जनतेच्या गोंधळात आणखीनच भर पडत आहे. गोंधळाने ग्रामीण जनता मात्र हैराण झाली असल्याचे चित्र समोर आहे. दरम्यान जव्हार शहर हे या तालुक्यातील २०० ते ३०० गाव-पाडयांचे जीवनावश्यक वस्तु खरेदी-विक्रीचे मुख्य ठिकाण आहे. दैनदिंन उलाढाली शिवाय शुक्रवार हा आठवडा बाजार सर्वदुर प्रसिध्द असुन नाशिक, घोटी, पालघर, वसई, वाडा, भिवंड, ठाणे, डहाणु आदीविध भागांतुन अनेक प्रकारचे वेगवेगळे वस्तु विक्रीचे व्यापारी येेथे बाजारासाठी येत असतांत. मात्र वर्षापुर्वी संचार बंदी मुळे जव्हारचा बाजार चार- पाच महिने बंद करण्यात आला होता. त्या मुळे याचा फटका व्यापारी वर्गाला जाणवला.
 
ग्रामीण शेतकरी, मजूर रोजगार नसल्याने मंदीच्या चक्रांत भरडला जात गेला. ज्या लोकांनी आपला व्यवसायाकरीता विविध मार्गाने कर्ज उचल केली होती. त्यांना बॅकांचे,पेढयांचे कर्जाचे हप्ते भरतांना तो मेटाकुटीला आला आहे. संचार बंदीने सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्ग हवालदिल झाला होता.
 
लॉक डाऊन हा निर्णय देशाच्या हिताचा असला तरी कधी नव्हे एवढे मंदीचे सावट ग्रामीण भागात निर्माण झाल्याने अर्थ व्यवस्थेची निसटलेली घडी कधी सुरळीत होईल याची प्रतिक्षा व्यापारी वर्ग करीत असल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने दिली.