वणवे नैसर्गिक की यामागे षडयंत्र.?

पारस सहाणे    19-Mar-2021
Total Views |

  • नष्ट होतेय वनसंपदा वन्यप्राणी, वन विभागाचे दुर्लक्ष

जव्हार : काही दिवसांपूर्वी जव्हार तालुक्यातील राजेवाडी व जव्हार शहरातील संकल्प हॉटेल मागे मोठ्या प्रमाणात वने लागले तसेच पालघर जिल्ह्यात ठिकाणी मोठ्या प्रमाणात वणवे पेटत असल्याचे निदर्शनात आले होते. हे निसर्गाकडून लागतात की समाजकंटक वणवे लावलात याची चौकशी होणे आवश्यक आहे. वणव्यात मोठ्या वनसंपदा तसेच वन्यप्राणी बळी पडत असल्याने निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
vanva01545_1  H
 
शिकारीसाठी वणवे पेटवण्याचे प्रकार समोर येत आहेत, मोर ससे,लांडोर यांची शिकार करण्यासाठी समाजकंटक शिकारी आग लावतात .यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश वन विभागाचा अंकुश नसल्याचे दिसून येत. वणवे लागतात की लावले जातात याची चौकशी करणे आवश्यक आहे मात्र ती होत नाही. यामागे मोठे षड्यंत्र असू शकते असे अभ्यासक सांगतात. वणवे लावून नेमका कोणाला फायदा होतो हे तपासणे गरजेचे आहे.
 
वातावरणाचे तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस इतके मध्ये असताना अचानकपणे व विशेषता सुट्टीच्या दिवसात वनवे कसे काय लागतात हा प्रश्न अनेक निसर्गप्रेमींच्या मनामध्ये उपस्थित राहतो. वृक्ष लागवड तसेच लागवड वृक्षांची कोट्यावधी रुपयांचा खर्च करत असताना काही अधिकारी वर्गाचे निष्काळजीपणामुळे वणवे लागतात कोणत्याही प्रकारचा छडा लागत नाही. कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक कारणांमुळे लागलेल्या अनियंत्रित आगेला नैसर्गिक समजले जाते. आकाशातून पडणारी वीज उन्हाळ्यातील उष्ण व कोरडी व गवत भेटल्याने मोठी झाडे हलताना झालेल्या घर्षणामुळे गवत व पाने निर्मित जाणवणाऱ्या मिथेन सारख्या ज्वलनशील वायू मुळे वणवे पेटतात.
 
काही दिवसापूर्वी जव्हार तालुक्यातील राजेवाडी येथे वनवा पेटल्याने ने शेतकऱ्याचे लाख रुपये नुकसान होते झाले होते मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपदा नष्ट झाली होती. एकीकडे सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून दरवर्षी या कामी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला आहे नागरिक व सामाजिक संस्थांकडून सिड ब्लास्टिंग सीड बॉल च्या माध्यमातून वृक्षसंपदा मध्ये वृद्धी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अनेक स्थानिक जंगल संरक्षण समिती यांच्या मार्फत समस्यांचे नेमणूक करून शेकडो एकर जंगल राखले जातात असे असताना इतक्या प्रयत्नानंतर जंगलांमध्ये बेसुमार वनवे लागले तर संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करणे आवश्यक झाले आहे.
 
वणवे लावल्याने नेमका कोणाचा फायदा होतो हे शोधणे आवश्यक आहे. वनवे रोखणे शक्य नसल्यास अशा क्षेत्रांमध्ये नवीन लागवड करण्याबाबत फेर विचार करणे देखील गरजेचे आहे व न कर्मचा-यांची रात्रगस्त तसेच वायरलेस होणारी हजेरी प्रत्यक्ष जागेवर हजेरी घेण्याची व्यवस्था उभारणे गरजेचे आह पाच हेक्‍टरपेक्षा अधिक जंगल वणव्यात बाधित झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद कायद्यात असताना त्या अनुषंगाने कारवाई होताना दिसत नाही. शासनाकडून मिळणारा भरगच्च पगार व राज्य व केंद्र सरकार मिळणाऱ्या निधीचा योग्य विनियोग न करणाऱ्या अधिकाऱ्यांची मात्र चौकशी होत नसल्याचे दिसून आले आहे.
 
जंगलात फिरणारे गुराखी इतर लोक व बिडी सिगरेट किंवा जेवणासाठी लावलेली आग न विझवता गेल्यास किंवा वणवा पेटविल्यास झाडांची वाढ व विकासावर अनुकूल परिणाम होईल या गैरसमजुतीमुळे कृत्रिमरीत्या आग लावली जातात त्याचप्रमाणे काही वनपट्टे धारकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी तसेच शिकार करण्यासाठी सोपे जावे म्हणून आगी लावतात चोरटी तोड ,करणारे जाळ फाट्या जमा करणारे गवतात एखादे जनावर प्राणी असेल या भीतीने देखील आग लावतात मार्च महिन्यात असलेल्या कोरड्या हवामानाचा वाऱ्यामुळे आग झटपट पसरते व त्याचे रूपांतर होते.
 
जानेवारी महिन्यात पासून जंगलात विविध ठिकाणी विशेष करुन नवीन लागवड केलेल्या परिसरात आकृतिबंध आराखडा निर्माण करून ही कामे फेब्रुवारी पूर्व करणे अपेक्षित असते पानझड झालेल्या भागात खताची निर्मिती होऊन झाडाला पौष्टिक घटक मिळावे राखण्याकरिता तसेच जंगलातील अतिक्रमण वृक्षतोड रोखण्यासाठी साठी पहारेकरी अधिकारी-कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात येते त्याकरिता विशेष निधी दिला जात असतो त्याचा वृक्ष लागवडीसाठी पूर्वतयारी करण्यासाठी रोजंदारीवर काम करणारे मजूर वनविभागाच्या दिमतीला असतात त्यासोबत फॉरेस्ट गार्ड वनरक्षक डेंजर इतर वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असतो. अनेक वनक्षेत्र मध्ये फेब्रुवारी ते जून या कालावधीत वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना सुट्टी न देण्याची पद्धत असून त्यांच्यामार्फत जंगलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्यात येते.