पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

जनदूत टिम    19-Mar-2021
Total Views |
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना कारोनाची लागण झाली आहे. जळगाव महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडीत सत्तांतर करण्याची भूमिका त्यांनी बजावली आहे. गेल्या दोन दिवसापासून ते मुंबईतच आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरून सांगितले आहे.
 
Gulabrao-patil-2_1 &
 
‘आपल्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले आहे. ते मुंबईत कोणत्या रुग्णालयात उपचार घेणार आहेत, याची माहिती मिळाली नाही. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती,” असे टि्वट गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
 
माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप होता त्यांनी कोरोनाची तपासणी केली, असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते जामनेर येथे गृहविलगीकरणात आहेत. आज महाजन यांनी टि्वट करीत पुढील उपचारासाठी मुंबईला जाणार असल्याचे सांगितले आहे.
 
आपल्या टि्वटमध्ये गिरीश महाजन म्हणतात की, दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार
घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे.