कर नाही तर डर कशाला” कायद्यासमोर सत्य हेच अंतिम असतं

जनदूत टिम    14-Mar-2021
Total Views |
मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात चर्चेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. पुराव्यांच्या आधारे कोर्ट निर्णय घेत असते, जर कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला असेल तर त्यामागे काही तरी सत्यता आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगितले.
 
Pravin-Darekar_1 &nb
 
एपीआय सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यावर दरेकर म्हणाले की, सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे आता तरी सरकारने यातून जागं व्हायला पाहिजे. कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला याचा अर्थ सकृतदर्शनी काही पुरावे असतील. काहीही असलं तरी या प्रकरणातील सत्यता वाढायला लागली आहे. तत्काळ सचिन वाझे यांना निलंबित करण्याची आवश्यकता आहे, असेही दरेकर म्हणाले.
 
सचिन वाझें यांनी ठेवलेल्या वादग्रस्त स्टेटस बाबत दरेकर म्हणाले की, एपीआय सचिन वाझे हे यापूर्वी मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागात होते, ते कठोर मनाचे असल्यामुळे धाडसी वृत्तीने चांगल्या कामगिरीही त्यांनी केल्या आहेत. सचिन वाझे सर्व बाजूने अडचणीत आल्यामुळे कदाचित व्यथित होऊन, निराशेपोटी अशा प्रकारचे स्टेटस त्यांनी ठेवले असावे. परंतु ते जर चुकले नसतील तर “कर नाही तर डर कशाला” याप्रमाणे संयमाने व धाडसाने त्यांनी या प्रसंगाला सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. कायद्यासमोर सत्य हेच अंतिम असतं, सत्यता समोर येईलचं