नीवजीवन फाउंडेशनतर्फे कम्युनिटी टेलरिंग सेंटरचे उद्घाटन

पारस सहाणे    14-Mar-2021
Total Views |
जव्हार : नीवजीवन फाउंडेशनच्या वतीने जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावात पहिल्या सामुदायिक शिवणकाम केंद्राचे उद्घाटन झाले. एका तुकडीत २० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेल्या या केंद्राचे उद्घाटन गीता दत्तगुप्त संस्थापक आणि संचालक IMCO Alloys यांनी केले.
 
faundation1254_1 &nb
 
नीवजीवन फाउंडेशनने युवा परिवर्तन सह भागीदारी केली आहे. जे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी संबंधित आहे (एनएसडीसी) आपल्या विद्यार्थ्यांना 3 महिन्यांचा शिवणकाम कोर्स देण्यासाठी. शिवणकाम संबंधित तांत्रिक ज्ञानाव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना उद्योजकताची मूलतत्त्वे देखील शिकविली जातील जेणेकरुन ते अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत, विद्यार्थी स्वतःच रोजीरोटीसाठी/उदरनिर्वाहासाठी अधिक संधी शोधण्यास तयार असतील.
 
शेती व शेतीपूरक व्यवसायासंदर्भातील शेवटच्या Batch चा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.शेतकऱ्यांची पहिली Batch मध्ये मोगरा,भाजीपाला लागवड, आणि कुकुटपालन यांचे कृषी विज्ञान केंद्र, डहाणू यांच्यातर्फे प्रमाणपत्र दिले होते त्याचे आज वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे या प्रशिक्षणार्थी याना व्यवसायाचे सुद्धा प्रशिक्षण दिले होते जेणेकरून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
 
यावेळी बोलताना गीता दत्तगुप्त म्हणाल्या, “स्थानिक समुदायासाठी हा एक चांगला उपक्रम आहे आणि मला खात्री आहे की या क्षेत्रात लोकांच्या रोजीरोटी/उदरनिर्वाह आणि उत्पन्नाच्या पातळीवर याचा दीर्घकाळ सकारात्मक परिणाम होईल. मी टीम नीवजीवनला त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये शुभेच्छा देते.” नीवजीवन फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक प्रोटिक कुंडू म्हणाले, “आमचा प्रयत्न हा आहे की विकासापासून कोसो दूर असणाऱ्या तरुण आणि महिलांना शाश्वत रोजगार मिळवून देऊन उद्योग व नागरी समाजात सक्रिय सहभाग मिळेल. चांगल्या मूल्यांचा व परिणामकारक रोजीरोटीच्या/उदरनिर्वाह उपक्रमांचा उपयोग करुन उद्योजकांची स्थापना करुन ग्रामीण समुदायाचे पुनरुज्जीवन करणे हा आहे. त्या दिशेने अशा अनेक उपक्रमांपैकी ही शिवणकाम केंद्र आहे. ”
 
कृषी आणि संबंधित उद्योगांचे व्यवसाय आणि उद्योजकतेसह शिवनकामाचे वर्ग हे प्रमुख कोर्स असतील तर नीवजीवन फाउंडेशन लवकरच सामुदायिक संगणक केंद्र, आणि मोटार मेकॅनिक, मोबाईल रिपेयरिंग, ब्युटीशियन आणि काही इतर विशेष अभ्यासक्रम सुरू करणार आहे.