टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट कायम

जनदूत टिम    07-Feb-2021
Total Views |
टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट अधिक गडद होत चाललं असताना रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आले. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना करताना टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. पण, शतकी भागीदारी पूर्ण केल्यानंतर दोघंही एकापाठोपाठ माघारी परतले. चेतेश्वर पुजारा तर विचित्र पद्धतीनं बाद झाला. रिषभचे शतक पुन्हा एकदा हुकले. हे दोघं खेळपट्टीवर असेपर्यंत टीम इंडियावरील फॉलोऑनचं संकट टळेल असे वाटले होते, परंतु ते अजूनही कायम आहे. वेस्ट इंडिजचा नादच करायचा न्हाय...!; पदार्पणातच कायले मेयर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् संघाचा रोमहर्षक विजय
 
rishab_1  H x W
 
- जो रुटच्या द्विशतकाच्या जोरावर आणि अन्य फलंदाजांच्या महत्त्वाच्या खेळींमुळे इंग्लंडनं पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभा केला. पण, जोफ्रा आर्चरनं चौथ्याच षटकात अप्रतिम बाऊन्सर टाकून रोहितला स्तब्ध केलं. शुबमन गिलला आर्चरच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारणे महागात पडले. ३८ वर्षीय जेम्स अँडरसननं अफलातून झेल घेतला.
- विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हे संघाचा डाव सावरतील अशी अपेक्षाही फोल ठरली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या विराटकडून अपेक्षाभंग झाला.