इंग्लंडचं मजबूत ‘ROOT’

जनदूत टिम    05-Feb-2021
Total Views |
भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. डॉम सिब्ली आणि रोरी बर्न्स यांनी इंग्लंडला आश्वासक सुरूवात करून दिली. श्रीलंका दौरा गाजवणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं भारतीय गोलंदाजांना दमवलं. रुटचे खणखणीत शतक व सिब्लीच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसात इंग्लडनं 3 बाद २६३ धावा केल्या. दिवसाच्या अखेरच्या षटकात जसप्रीत बुमरानं सिब्लीला ( ८७) माघारी पाठवले. रुट १२८ धावांवर नाबाद आहे.
 
root025478_1  H
 
इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं रचला इतिहास; भारतीय गोलंदाजांची केली धुलाई
- राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत नेट्समध्ये सराव करणाऱ्य़ा शाहबाज नदीमला अचानक Playing XI मध्ये संधी देत कर्णधार विराट कोहलीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला
 
- १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडनं या सामन्यात प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला विश्रांती देण्याचा धाडसी निर्णय घेतला. Bad News; सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे खेळाडूची माघार
 
- १७ कसोटी व ७९ विकेट्सनंतर मायदेशात पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहला पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली असती, परंतु रिषभ पंतनं झेल सोडला.
 
- इंग्लंडचे सलामीवीर डॉम सिब्ली आणि रोरी बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. पण, आर अश्विननं बर्न्सला माघारी पाठवले, त्यानतंर बुमराहनं डॅन लॉरेन्स ( ०) याला पायचीत केले आणि पहिल्या सत्रात इंग्लंडची अवस्था २ बाद ६७ अशी झाली. जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू अन् रिषभ पंतकडून सुटला झेल
 
- जो रुट व डॉम सिब्ली यांनी शतकी भागीदारी करताना दुसऱ्या व तिसऱ्या सत्रावर वर्चस्व गाजवले. जो रूटनं आतापर्यंत भारतात ७ कसोटी सामने खेळले आणि प्रत्येक सामन्यातील किमान एका डावात तरी त्यानं ५० किंवा ५०+ धावा केल्या आहेत. टीम इंडिया कशी करू शकते अंतिम फेरीत प्रवेश?; इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनाही संधी
 
- जो रुटची भारतातील कसोटी सामन्यांतील कामगिरी ७३ व २०* ( नागपूर), १२४ व ४ ( राजकोट), ५३ व २५ ( वायझॅक), १५ व ७६ ( मोहाली), २१ व ७७ ( मुंबई), ८८ व ६ ( चेन्नई), ५१* (चेन्नई)
 
- पण, ९८, ९९ व १०० व्या सामन्यात शतकी खेळी करणारा जो रुट हा जगातील पहिलाच क्रिकेटपटू आहे. भारतात दाखल होण्यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटीत त्यानं ( २२८ व १८६) शतकी खेळी केली होती.
 
- जो रुट व डॉम सिब्ली यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतात भारताविरुद्ध केलेली ही दुसरी द्विशतकी भागीदारी आहे. यापूर्वी २०१२मध्ये जॉनथन ट्रॉट व इयान बेन यांनी चौथ्या विकेटसाठी दोनशे धावा जोडल्या होत्या.