पालघर जिल्ह्याकरिता जलसंपदा विभाग कटिबद्ध – मंत्री जयंत पाटील

जनदूत टिम    04-Dec-2021
Total Views |

  • डहाणू व तलासरी करिता कालवे करण्याकरिता मान्यता द्यावी – आमदार विनोद निकोले

डहाणू : धरणातील पाणी स्थानिकांना मिळावे म्हणून कालवे करण्यासाठी मान्यता द्यावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी महाराष्ट्र राज्य मंत्रालय येथे झालेल्या पालघर जिल्ह्यातील धरण परिसरातील विकास कामे व पाणी वाटप नियोजन याबाबत आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
 
PATIL_1  H x W:
 
यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, 128 डहाणू (अ.ज) विधानसभा मतदारसंघात डहाणू व तलासरी हे 02 तालुके येत असून या भागातून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची सीमा आहे. पालघर जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या मोठी प्रमाणावर आहे. पाडे, वस्त्या, विखुरलेले आहेत. येथील आदिवासी समाजाने धरणासाठी आपली शेत जमीन देऊन देखील येथील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्या अनुषंगाने डहाणू तालुक्यातील गंजाड ते आशागड ते जामशेत ते सोगवे ते सरावली ते कैनाड ते वाकी ते कोसबाड या कालवे करीता तसेच तलासरी तालुक्यातील कुर्झे ते तलासरी ते सूत्रकार ते सावरोली ते कोचाई ते उपलाट ते करंजगाव ते डोंगारी ते वेवजी या गावातून कालवे देण्याबाबत मान्यता द्यावी जेणेकरून येथील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
 
यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, पालघर जिल्ह्या करिता जलसंपदा विभाग कटिबद्ध असून प्रत्येक नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वस्त केले. याप्रसंगी आ. राजेश पाटील, आ. सुनील भुसारा, यांच्या सहित कोकण प्रदेश सहाय्यक मुख्ख अभियंता रोहित पोळ, ठाणे पाटबंधारे विभाग नरेंद्र महाजन, उप विभागीय अभियंता ठाणे धनराज पाटील, पालघर पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता रवी पवार, सूर्यानगर पालघर पाटबंधारे बांधकाम विभाग उप विभागीय अभियंता अनिल पाटील, सूर्यानगर पालघर पाटबंधारे बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.