पाचव्या दक्षिण आशियाई जिमनॅस्टीक स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचा निशांत करंदीकर ठरला पदकवीर!

जनदूत टिम    08-Nov-2021
Total Views |
मुंबई : बांगला देश येथे नुकत्याच पार पडलेल्या पाचव्या मध्य-आशियाई जिमनॅस्टीक स्पर्धेत जिमनॅस्ट निशांत करंदीकरने दोन कांस्य व दोन रौप्य पदकासह चार पदके प्राप्त केली आहेत. तसेच याच स्पर्धेत मुंबईच्या आयुष खामकरने दोन पदके जिंकून यश संपादन केले आहे.
 
nishant_1  H x
 
निशांत करंदीकर हा विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचा खेळाडू आहे. निशांत करंदीकरने पॅरलल बार्स प्रकारात वैयक्तिक तसेच सांघिक रौप्य पदक जिंकले आहे. आयुषने पॅरलल बार्स तसेच टेबल व्हाॅल्टमध्ये वैयक्तिक ब्राँझ पदक जिंकले आहे.
जिमनॅस्ट निशांत करंदीकरला निष्णात प्रशिक्षक शुभम गिरी यांचे सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.
 
विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे तसेच इतरही प्रशिक्षक यांचे सुयोग्य मार्गदर्शन व प्रेरणादायी सहकार्य खेळाडूना वेळोवेळी मिळत असते. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे प्रशिक्षक व पदाधिकारी यांच्या कौतुकास्पद प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे अनेक खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात विजय संपादन करत आहेत.