भिवंडी लोकसभेचा पुढील खासदार हा कॉंग्रेसचाच असणार - पटोले

जनदूत टिम    22-Nov-2021
Total Views |
ठाणे : ठाणे ग्रामीण जिल्ह्यात काँग्रेसला जनाधार वाढत असून मोदी सरकारच्या हुकूमशाहीचा अंत जवळ आला आहे. भिवंडी लोकसभा मध्ये भाजपचा पराभव अटळ असून पुढील खासदार हा कॉंग्रेसचाच असेल असा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी बदलापूर येथे केला.
 
congress4_1  H
 
काँग्रेसच्या नूतनीकरण केलेल्या बदलापूर कार्यालयाचे उदघाटन व जिल्हा कार्यकारिणी पद वाटप सोहळा प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. तर ठाणे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनीही नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामूळे युवा वर्ग काँग्रेस कडे आकर्षित होत असल्याचे सांगून ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आपले अस्तित्व सिद्ध करील असे सांगितले.
 
यावेळी ठाणे जिल्हा प्रभारी सुभाष कानडे, सहप्रभारी कॅप्टन निलेश पेंढारी, प्रदेश सचिव राजेश घोलप, हरीचंद्र थोरात, संतोष केणे, महिला जिल्हा अध्यक्षा संघजा मेश्राम, अपर्णा खाडे, शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके, मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन पवार, कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, भिवंडी तालुका अध्यक्ष राकेश पाटील, बदलापूर महिला अध्यक्षा आस्था मांजरेकर, बदलापूर कार्याध्यक्ष रंजन एडवनकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीत 67 पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले व उपाध्यक्ष सुभाष कानडे यांच्या हस्ते सर्वांना नियुक्ती पत्रे देण्यात आली, प्रस्ताविक बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव यांनी तर संचलन महेश धानके यांनी केले, यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.