राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक कल्याण येथे संपन्न

जनदूत टिम    21-Nov-2021
Total Views |
कल्याण (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा(ग्रा) सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक कल्याण येथे संपन्न झाली. पक्षाच्या संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पक्ष संघटन वाढविण्यासाठी व सामाजिक न्यायच्या कार्यकर्त्याला पक्ष्याच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनेक ठराव सहमत करण्यात आले.
 
NCP_1  H x W: 0
 
ठराव क्र १ : संघटनात्मक वाढीसाठी तसेच जनसामान्यांच्या सामाजिक व मागासवस्त्यांतील पायाभूत सोयी सुविधांबाबत (रस्ते, वीज,पाणी पुरवठा, शिक्षण आदी) समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हात राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा अविनाश थोरात यांच्या नेतृत्वात जनसंपर्क अभियान राबविणे, व पक्ष श्रेष्ठींच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. तसेच पक्षाकडून सुरू होत असणाऱ्या क्रियाशील सदस्य नोंदणीत जिल्ह्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे.
 
ठराव क्र २ : राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांना तालुका स्तरीय, जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय शासकीय समिती व महामंडळावर नियुक्त करण्यात यावे असा ठराव एकमताने सहमत करण्यात आला.
 
ठराव क्र ३ : होत असलेल्या नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवार ठरविणे अथवा निवडणूक निर्णय प्रक्रियेत त्या त्या स्तरावरील सामाजिक न्याय च्या प्रमुखास विचारात घेतले जावे असा ठराव सर्वानुमते सहमत करण्यात आला. सदर बैठकीस सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष उपस्थित होते.