जिल्हा वार्षिक नियोजनेचा 2021-22 साठी 405 कोटी 24 लाखाचा आराखडा मंजूर

जनदूत टिम    19-Nov-2021
Total Views |

  • 2020-2021 च्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता
  • विकास कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री दादाजी भुसे यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी निर्देश

पालघर: चालू आर्थिक वर्षात विविध कारणांमुळे जिल्हा वार्षिक योजनांचा निधी कमी प्रमाणात खर्च झाला आहे. जिल्ह्याची विकासकामे वेळेत करुन हा निधी मार्चपूर्वी खर्च करण्यासाठी प्रशासनासह सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
 
pal55_1  H x W:
 
जिल्हा नियोजन समितीची सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजनांची प्रारुप आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राज्याचे कृषी , माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष्या वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावीत, आमदार सर्वश्री रविंद्र फाटक, दौलत दरोडा, शांताराम मोरे, राजेश पाटील, विनोद निकोले, सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी ब.चा.चौरे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
 
प्रारंभी जिल्हा नियोजन समितीने मागील बैठकीतील इतिवृत्त व त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनु.जाती उपयोजना (विशेष घटक योजना), जिल्हा आदिवासी उपाययोजना क्षेत्रा बाहेरील क्षेत्र (OTSP ) सन 2020-21 अंतर्गत अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली. सदर पुनर्विनियोजन प्रस्तावामध्ये सर्वसाधारण योजनेखालील अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांखालील व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्राखालील 31 मार्च 2022 अखेर खर्च होऊ न शकणारा निधी योग्य बाबिंवर खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांना जिल्हा नियोजन समितीने दिले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्र सन 2021-22 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
 
यामध्ये एकूण अदिवासी उपयोजना क्षेत्रा करिता 272 कोटी 38 लक्ष रुपये आदीवासी उपयोजना क्षेत्रा बाहेरील क्षेत्रासाठी 51 कोटी 1 लक्ष रुपये असे एकूण आदिवासी घटक कार्यक्रमाकरिता 267 कोटी 38 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. विशेष घटक कार्यक्रमा अंतर्गत 119 कोटी 4 लक्ष रुपये तर सर्वसाधारण साठी 175 कोटी 92 लक्ष रुपये असे एकूण जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 405 कोटी 24 लक्ष रुपये सन 2021-22 साठी मंजूर करण्यात आले.
 
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या मर्यादेव्यतिरिक्त वाढीव मागणीसह आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती उपयोजनेच्या व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्राच्या सन 2021-2022 च्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.
यावेळी आयत्या वेळच्या विषयांना मान्यता खालील प्रमाणे देण्यात आली.
 
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान, नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा, अग्निशमन व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण, गिरीस्थाननगरपरिषदांना पर्यटनासाठी विशेष अनुदान व लोकशाहीरअण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधारणा योजना या योजनांतर्गतच्या सन 2020-21 च्या मूळ मान्य आराखड्याबाहेरील सोबतच्या यादीतील कामांना जिल्हा नियोजन समितीची मान्यता प्रदान करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन यांनी सादर केला. त्यास मान्यता देण्यात आली.
 
पालघर जिल्ह्यातील वडराई येथील मच्छीमार श्रीधर चामरे यांच्यावर पाकीस्थानी सैनिकांनी भारतीय समुद्र हद्दीत केलेल्या गोळीबारात मृत्यु झाला होता. शासनामार्फत पालकमंत्री दादाजी भूसे यांनी त्यांच्या कुटुबियांना 5 लाखाचा धनादेश सुपुर्द केला.
केळवा कीनारपट्टी येथिल पर्यटनाच्या दुष्टीने सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री यांनी केळवा समुद्र किनारा येथे पाहणी करुना अधिकाऱ्यांना समुद्र किनाऱ्यावर सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता सुचाना केल्या.