जेएसडब्ल्यू स्टील लि. वासिंद या कंपनीपासून नागरिकांच्या जिवाला धोका

अविनाश जाधव    18-Nov-2021
Total Views |
वासिंद / ठाणे: वासिंद परिसरात असलेली जेएसडब्ल्यू स्टील लि. (जिंदाल) मानवीय जिवनाला धोका निर्माण झाला असून कंपनीच्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झारले असून, वासिंद परिसरातील धुक्याचे (धूर) वातावरण असल्याने होणारे प्रदुषण मानवी जीवनाला धोकादायक ठरत आहे.
 
chio55_1  H x W
 
कंपनिच्या प्रदुषणामुळे केमिकल मिश्रित धूराचे लोंढे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत असून मानवी जीवनाच्या आरोग्याला धोकादायक ठरत असून सर्दी, खोकला व अंगाला खाज असे वै‌द्यकीय अहवालानुसार दिसून येत आहे. त्याकरिता वासिंद परीसरातील जेएसडब्ल्यू स्टील लि. केमिकल मिश्रीत प्रदुषण होत असून त्याकरिता लवकरात लवकर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब, उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब यांनी लवकरात लवकर कारवाई करून व प्रदुष महामंडळ यांनी योग्य ती करवाई करून वासिंद परिसरातल्या गावांना मानवी जिवनाचा धोका टळावे त्याकरिता जेएसडब्ल्यू स्टील लि. मधून निघणार धूर याची पाहणी करून तात्काळ कारवाई करवी. अनेक वासिंद परिसरातील ही अाजाराची साथ असून वैद्यकीय डॉक्टरांचा सर्दी, खोकला व अंगाला खाज या रोगांपासून कंपनीमुळे, कंपनीच्या चिमणीच्या धुरामुळे त्रास होतो हे दिसून येते. ग्रुप ग्रामपंचायत साने-पाली, माजी सदस्य व शहापूर तालुका शिवसेना सहसचिव व नागरिकांनी जेएसडब्ल्यू यांची चौकशी करून कारवाई करावी व्हावी.