आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेमध्ये सावद गावातील खेळाडूंना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक....

जनदूत टिम    17-Nov-2021
Total Views |
भिवंडी : एशियन बॉक्स लंगडी फेडरेशनच्या वतीने ३ दिवसीय बॉक्स लंगडी चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन नेपाल येथील काठमांडू शहरातील बुद्ध स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे नेतृत्व भिवंडीतील ११ स्पर्धकांकडे होते.
 
anter44_1  H x
 
या संधीचं सोनं करून खडतर मेहनत, नियमित सराव, जिद्द, चिकाटी च्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून देशाचा व गावाचा झेंडा प्रदेशात फडकवला आहे. विजयी खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी सावद गावातून ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. विजयी खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आमने पाडा सरपंच संतोष काकडे, काँग्रेसचे परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष शांताराम म्हात्रे, रामकृष्ण काकडे, तालुका अध्यक्ष सागर पाटील यांच्यासह ग्रामस्थ मंडळी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.
 
खेळाडूंची नावे- आमने पाडा गावातील मितेश बाळाराम काकडे, गोरसई गावातील नयन संजय केणे, जु-नांदूरकी गावातील भाविका भालचंद्र पाटील, कांबे गावातील जय किरण दापोडकर, आणगाव येथील वेदांत कोळी, भादवड गावातील दिक्षांती संतोष म्हात्रे, वावली गावातील नेत्रा नवनाथ शेलार, जानवल गावातील समृद्धी उत्तम पाटील, तर टेंबिवली गावातील संचिता शेखर भोईर.