रोटरीने  दिव्यांगांना दिली आनंदाची दिवाळीभेट - सुमन आर अग्रवाल

जनदूत टिम    16-Nov-2021
Total Views |
मुंबई : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ व ३०७० यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्ननिधी संस्थेच्या सहकार्याने हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा परिसरात गोरगरिब-गरजू व दिव्यांगांसह विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचे वाटप करण्यात आले.

suman44_1  H x  
 
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे गव्हर्नर राजेंद्र अग्रवाल आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३०७० चे गव्हर्नर डॉ. यू.एस.घई यांच्या नेतृत्वाखाली व रत्ना निधी चारीटेबल ट्रस्ट यांच्या मदतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात १६५ दिव्यांगांना जयपूर फूट, १० व्हील चेअर, ५० शाळांतील आर्थिक दुर्बळ विद्यार्थ्यांना ५००० नोटबुकचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या गोरगरिब-गरजूंना 800 उबदार कपड्यांचेही याप्रसंगी वाटप करण्यात आले.
 
धर्मशाळेच्या सभागृहात आयोजित सदर कार्यक्रमात सहभागी होऊन त्यास यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मुंबई-ठाण्यातून १७० रोटेरियन्सची टिम तेथे पोहोचली होती. समारंभात कृत्रिम अवयव बसविल्यानंतर दिव्यांगांच्या चेहऱ्यावरची उर्मी बघण्यासारखी होती, तो क्षण फारच अविस्मरणीय होता. या कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता रोटेरियन सुमन आर अग्रवाल, रोटरी क्लब ऑफ साऊथ मुंबईचे अध्यक्ष राजीव पुणेतर, रोटरी क्लब ऑफ वरळीच्या अध्यक्षा दीप्ती राजदा, मुख्य जिल्हा समन्वयक व्ही.एस. परमार, रोटरी क्लब ऑफ धर्मशाळाचे अध्यक्ष डॉ.संग्राम गुलेरिया, जिल्हा सचिव डॉ.विजय शर्मा, रोटरी क्लब ऑफ धर्मशाळाचे सचिव अजय शर्मा, राजीव मेहता, अनूप गुप्ता व ३१४१ चे सर्व रोटेरिअन आदींनी विशेष सहकार्य केले.
 
मुंबई-ठाण्यातील रोटेरियन्सच्या टिमने तेथील दिव्यांग, विद्यार्थी आणि गोरगरिब-गरजू लोकांमध्ये याप्रकारे आनंदाचा वाटप केलाच, तसेच धर्मशाळेसह जवळपासच्या विविध सुंदर पर्यटनस्थळांना आणि तीर्थक्षेत्रांनाही भेट देऊन आनंद लुटला, ज्यामध्ये अमृतसरचे सुवर्ण मंदिर, जालियांवाला बाग, वाघा बॉर्डर, गोविंदगड किल्ला, कांगडा देवी मंदिर, तिबेटी प्रार्थना स्थळ, चामुंडा देवी मंदिर, ज्वालामुखी देवी मंदिर, सेंट जॉन चर्च, एचपीसीए स्टेडियम आणि हिमाचल प्रदेशचे चहाचे बाग आदींचा समावेश होता.